Wednesday, September 23, 2020

बोर्डो मिश्रण कसे तयार कराल

 बोर्डो मिश्रण: 

  • बऱ्याच काळापासून आपण  बोर्डो मिश्रणचा वापर करत आहोत. बोर्डो मिश्रण हे एक चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक  आहे. इतर बुरशीनाशकांपेक्षा स्वस्त आहे. बोर्डो मिश्रण हे डाळिंब फळपिकांच्या बागेत फवारणी केल्यास संपूर्ण बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगावर नियंत्रण करते पण ते चांगल्या प्रकारे बनवने गरजेचे आहे. बोर्डो मिश्रण  फवारणी केल्यामुळे बागेतील कीडनियंत्रण होण्यासही मदत होते. बोर्डो मिश्रण हे नेहमीच ताजे बनवून लगेच फवारणी करावी.आज बनवलेले बोर्डो मिश्रण हे उद्या फवारणी करू नयेत.


  • 1% (एक टक्का) बोर्डो मिश्रण फवारण्या ह्या फक्त छाटणी झाल्यावर लगेच आणि विश्रांतीच्या काळातच कराव्यात.
  • 0.5% (आर्धा टक्का) बोर्डो मिश्रण फवारण्या ह्या फक्त बहार व्यवस्थापण काळातच कराव्यात.

बोर्डो मिश्रण आणि पेस्ट बनविन्याची पध्दत:

       1) 1% (एक टक्का) बोर्डो मिश्रण :

  • मोरचुद (Copper Sulphate) 1कीलो कुटुन/बारीक करून प्लास्टिकच्या बकेटीत 10 लिटर पाण्यात रात्रभर भिजवून घ्या. त्याच प्रमाणे चुना (Lime) पाण्याचा pH आणि चुन्याच्या शुध्दतेनुसार 250-400 ग्रँम  प्लास्टिकच्या  बकेटीत ,10 लिटर पाण्यात रात्रभर भिजवून घ्या. सकाळी जेव्हा तुम्हाला बोर्डो मिश्रण बनवायचे आहे तेव्हा सिमेंटच्या/प्लास्टिकच्या टाकीत 80 लिटर पाणी टाका नंतर रात्रभर भिजवलेले चुना आणि मोरचुद वेगवेगळे लाकडी काठीने चांगले ढवळून घ्यावे त्यानंतर दोन्ही द्रावणातील आर्धा आर्धा लीटर द्रावण वेगवेगळ्या प्लास्टिकच्या मग/भांड्यात मध्ये काढावे.उरलेले 9.5 लीटर चुन्याचे द्रावण ढवळून एका व्यक्तीने  घ्यावे आणि  9.5 लीटर मोरचुद द्रावण ढवळून एका व्यक्तीने  घ्यावे आणि 80 लीटर पाणी टाकलेल्या टाकीत एक सारखे ओतावे आणि एका एका व्यक्तीने लाकडी काठीने ते द्रावण एकजीव होईपर्यंत ढवळावे नंतर डीजीटल pH मिटरने किंवा pH पट्टीने pH पाहा pH कमी असल्यास आपण ठेवलेले आर्धा लीटर  चुन्याचे द्रावण ढवळून थोडे-थोडे 2-3 वेळा pH येन्यापर्यत ढवळून टाकावे.
  • pH जास्त असल्यास आपण ठेवलेले आर्धा लीटर  मोरचुदचे द्रावण ढवळून थोडे-थोडे 2-3 वेळा pH येन्यापर्यत ढवळून टाकावे आणि नंतर pH 6.9-7.1 आल्यानंतर फवारणी करावी.
  • जर तुमच्या कडे pH मिटर किंवा pH पट्टी नसेल तर चांगली स्वच्छ केलेली लोखंडी पट्टी/खिळा/खुरपे बोर्डो मिश्रणात एक मिनिटं बुडवून ठेवा नंतर बाहेर काढून  लोखंडावर जर लालसर तांब्यासारखा रंग आला तर त्या द्रावणामध्ये मोरचुद जास्त प्रमाणात आहे असे समजावे नंतर   आपण ठेवलेले आर्धा लीटर  चुन्याचे द्रावण ढवळून थोडे-थोडे 2-3 वेळा ढवळून टाकावे. पुन्हा एकदा लोखंडी पट्टी/खिळा/खुरपे बोर्डो मिश्रनात एक मिनिटं बुडवून ठेवा नंतर बाहेर काढून  लोखंडावर जर लालसर तांब्यासारखा रंग नाही आला तर तुमचे द्रावण फवारणी योग्य झाले असे समजावे.

       2)0.5% (आर्धा टक्का) बोर्डो मिश्रण :

  • मोरचुद (Copper Sulphate) कुटुन/बारीक करून 1/2 (आर्धा) कीलो/100ली पाण्यासाठी घ्यावा आणि त्या सोबत चुना (Lime) शुध्दतेनुसार 125-200ग्रँ/100ली पाण्यासाठी घ्यावा बाकी सर्व वरील पध्दतीने करावे.

       3)10%बोर्डो पेस्ट :

  • 10% बोर्डो पेस्ट ही वर्षातून दोनदा लावने गरजेचे आहे एकदा छाटणी सोबत/छाटणी झाल्यावर लगेच आणि दुसऱ्यांदा पावसाळा संपल्यावर लगेच सप्टेंबर ते आँक्टोबरमध्ये यामुळे खोडावर खोडकिडा किंवा खोड भुंगेरेचा प्रादुर्भाव होत नाही

  •  मोरचुद (Copper Sulphate) कुटुन/बारीक करून 1किलो/10 ली पाणी. 1किलो मोरचुद प्लास्टिकच्या भांड्यात 5 लिटर पाण्यात रात्रभर भिजवून घ्या. 
  • त्याचप्रमाणे चुना (Lime) 1 किलो/10 ली पाणी. 1किलो चुना प्लास्टिकच्या भांड्यात 5 लीटर पाण्यात रात्रभर भिजवून घ्या. 
  • सकाळी जेव्हा तुम्हाला बोर्डो पेस्ट बनवायचे आहे तेव्हा चुना आणि मोरचुदचे द्रावण ढवळून एकसारखे प्लास्टिकच्या भांड्यात ओतने व त्यात  क्लोरोपायरीफाँस 20 मिली किंवा ईमिडाकक्लोप्रिड 20 मिली टाकून लाकडी काठीने चांगले ढवळून घ्यावे त्यानंतर पेस्ट तयार होऊन लाकडी काठीवर थर चढल्यास चांगली पेस्ट तयार झाली समजुन झाडाचे वय आणि ऊंची नुसार खोडावर 1-2.5 फुट वरपर्यंत ब्रशने लावावी.

  • टिप - बोर्डो पेस्टचा pH पाहण्याची गरज नाही 

  • टिप - 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी फक्त बागेत विश्रांतीच्या काळात आणि छाटणी झाल्यावरच  करावी.
  • 0.5% बोर्डो मिश्रण फवारणी बाग फुलधारनेपासुन ते फळे काढणी पर्यंत महीन्यातुन एकदा करावी. यामुळे बागेतील सर्व बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोग नियंत्रण होण्यास मदत होते आणि औषधांची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होउ शकतो.

Friday, September 11, 2020

हे..! खते एकमेकांन मध्ये मिसळू नका


हे..! खते एकमेकांन मध्ये मिसळू नका:



खालील खतांच्या जोड्या आहेत त्या कधीही एकमेकात मिसळू नये.


(1)कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम सल्फेट


(2)कॅल्शीयम नायट्रेट - पोटॅशियम सल्फेट


(3)कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम फोस्फेट


(4)कॅल्शीयम नायट्रेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट


(5)कॅल्शीयम नायट्रेट - फोस्पेरिक एसिड


(6)कॅल्शीयम नायट्रेट - सल्फ्युरिक एसिड


(7)अमोनियम फोस्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट


(8)पोटॅशियम सल्फेट - अमोनियम सल्फेट


(9)कॅल्शीयम नायट्रेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज


(10)पोटॅशियम कलोराइड - पोटॅशियम सल्फेट


(11)पोटॅशियम सल्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट


(12)पोटॅशियम सल्फेट - सल्फुरिक एसिड


(13)अमोनियम फोस्फेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज 


(14) फोस्फरिक एसिड  - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज 

Thursday, September 10, 2020

निंबोळी पावडरचे गुणकारी उपयोग

 

निंबोळी पावडर:

 


  • निंबोळी पावडर मध्ये ‘अॅझाडीरेक्टीन’ घटक असल्यामुळे मातीमधील हुमणी, खोडकीड, कटवर्म, वाळवी विषाणु, बुरशी या शत्रूकिटकां-रोगांचा ते नायनाट करते.
  • निंबोळी पावडर  हे संपूर्ण नैसर्गिक स्वरुपामधील निंबोळी पावडर असल्याने जमिनीमधील कोणत्याही उपयुक्त जिवाणुंना हानी पोहचत नाही.
  • निंबोळी पावडर  हे रासायनिक खतांमध्ये मिसळून वापरल्याने *रासायनिक खतांमधील नत्र टिकून राहते.

  • निंबोळी पावडर  पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून 100% संरक्षण करते.
  • निंबोळी पावडर  मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते.
  • निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते.
  • निंबोळी पावडर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच मातीमधील ह्युमसचे प्रमाण वाढवून पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यास मदत होते.
  • निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीचा सामू चांगला राखला जातो. परिणामी ऊत्पादन व गुणवत्ता वाढते.

निंबोळी पावडरचा उपयोग कसा करावा :

  • सर्व पिकांमध्ये वापरास योग्य असणारी ही निंबोळी पावडर एकरी 200 किग्रॅ वापरण्याची शिफारस आहे.
  • फळबागेमध्ये वापर करायचा असल्यास 500 ग्रॅम प्रति झाडच्या प्रमाणामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत द्यावे.
  • सेंद्रिय, रेसिड्यूफ्री, नैसर्गिक, जैविक, एकात्मिक, रासायनिक इ. सर्व शेती प्रकारामध्ये वापराकरिता पूर्ण सुरक्षित आहे.

जिवाणू हाच शेतीचा आत्मा आहे


जिवाणू शेतीचा आत्मा:
          

  • आपल्या शेतीजमिनीत कोणतेही पीक उत्तम यायचे असेल तर "जमिनीची सुपकता" अत्यंत महत्वाची आहे.त्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात.
  • आपण शेतात चालताना शेतजमीन इतकी भुसभुशीत असली पाहिजे की त्या जमिनीवरून चालताना आपण गादीवरून चालत आहोत असा भास झाला पाहिजे, ती जमीन  सुपीक, अशा जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब उपलब्ध असतो,जिवाणूंची संख्या एक मूठभर मातीत 10 कोटी पेक्षा जास्त असते ,त्यात 70 /80 प्रकारचे जिवाणू असतात.
  • ज्या जमिनीचा सामू 6.5 आहे, ज्या जमिनीचा EC  0.5 च्या आत आहे, ज्या जमिनीची सेंद्रिय कर्बाची पातळी 0.8 च्या पुढे आहे, ज्या जमिनित क्षारांची पातळी योग्य आहे असे खुप महत्वाचे घटक आहेत, कि ज्यावर आपल्या जमिनीची सुपीकता, आणि उत्पादकता अवलंबून असते.आपण शेतीतून उत्पन्न घेतो, ज्याकाही पिकांचे आपण उत्पन्न घेतो त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या 16 अन्न घटकांची आवश्यकता असते.
  • पिकास आवश्यक असणारे " मूळ अन्न द्रव्ये - घटक " 16 आहेत. आपल्या सोयी साठी याचे 4  गट केलेले  आहेत. त्याची माहिती गेल्या 15/20 दिवसापासून आपण घेत  आहोत.
नैसर्गिक अन्न घटक :

         1 कार्बन 
         2 हैड्रोजन 
         3 प्राणवायु 

हे घटक नैसर्गिक रित्या हवा पाणी सूर्यप्रकाश यांच्या पासून उपलब्ध होतात.

मुख्य अन्न द्रव्ये:

        1 नत्र 
        2 स्फुरद
        3 पालाश.
 प्रमाण जास्त लागते म्हणून मुख्य अन्न द्रव्ये म्हणतात.


दुय्यम अन्न द्रव्य:  
        1 कैल्शियम 
        2 मैग्नेशियम 
        3 गंधक. 

मुख्य अन्न द्रव्याच्या मानाने खुप कमी पुरवावे लागतत् म्हणून म्हणून यांना दुय्यम अन्न द्रव्ये म्हणतात.

सूक्ष्म अन्नद्रव्ये:

         1 फेरस = लोह
         2 झींक = जस्त 
         3 कॉपर = तांबे  
         4 मंगेनिज 
         5 मोलाब्द 
         6 बोरॉन 
         7 निकेल 

ही 7 अन्न द्रव्ये , मुख्य आणि दुय्यम अन्न द्रव्याच्या मानाने खुप कमी किंवा अति सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात ,म्हणून याना सूक्ष्म अन्न द्रव्ये असे म्हणतात.
  • वरील 1 क्रमांकाचे अन्न द्रव्ये नैसर्गिक रित्या पिकास मिळतात . त्याची फारशी चिंता करावी लागत नाही. मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्न द्रव्ये या तिन्ही अन्न द्रव्यांच्या बाबतीत लक्ष्य द्यावे लागते.
  • 13 अन्न द्रव्ये जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात, ते वजा जाता आवश्यक अन्न द्रव्ये जमिनीला पुरवावी लागतात. हे पुरवलेले अन्न घटक जसेच्या तसे म्हणजे दिलेल्या स्वरुपात पिकास "अपटेक्" "शोषण" करता येत नाहीत. म्हणून या स्वरूपास "स्थिर स्वरूप" किंवा Fix Form असे म्हंटले जाते. ही अन्न द्रव्ये पिकास "अपटेक्" करण्या योग्य स्वरुपात रूपान्तर व्हावे लागतत्. हे रूपान्तरणाचे कार्य जमिनीतिल जीवाणु करीत असतात. या प्रकारच्या जीवाणुंची 'संख्या आणि कार्यक्षमता' ही अत्यंत महत्वाची असते. या साठी त्याना त्यांचे खाद्य योग्य प्रमाणात पुरवावे लागते. आणि ते म्हणजे  सेंद्रिय कर्ब होय. जमिनित सेंद्रीय कर्बाची पातळी योग्य असावी लागते. जी आपल्या कड़े फारच कमी आहे. (वर्षानु वर्ष सातत्याने होणारा रासायनिक खतांचा मारा याला कारणीभूत आहे )सरसरी 0.3 ते 0.5 एवढीच असते. ही पातळी वाढवणे साठी जैविक कर्ब द्यावा लागतो. जैविक  कर्ब हा सेंद्रिय खतातून उपलब्ध होत असतो.
  • जैविक खतामुळेच किंवा जीवणूमुळेच आपल्याला उत्पन्न मिळते आपल्या जमिनीत जिवाणू नसतील तर तुम्ही कितीही रासायनिक खते द्या उत्पन्न कमी मिळते.
  •  याचे एक उदाहरण ज्या जमिनीची लेव्हल केलेली असते त्या जमिनीत 2/3 वर्ष उत्पन्न मिळतच नाही, कारण जसे दूध तापवून थंड झाल्यावर त्याला साय येते, म्हणजे साय हा दुधाचा पौष्टीक पदार्थ असतो, तसे जमिनीत वरचा 1 विथचा जो थर असतो तो म्हणजे जमिनीचा पौस्टिक पदार्थ असतो, त्यातच सर्व प्रकाचे जिवाणू असतात  आणि हाच 1 विथ जमिनीचा थर लेव्हल केल्यामुळे खोल गाडला जातो व जिवाणू नसलेला मातीचा थर वर टाकला जातो .
  • रासायनिक पदार्थ ,सेंद्रिय कर्ब यांचा झाडाला पुरवठा करणारे जिवाणू उपलब्ध नसल्यामुळे ते पदार्थ झाडाला  ,पिकांना मिळत नाहीत आणि म्हणून लेव्हल केलेल्या जमिनीत 2/3 वर्ष उत्पन्न मिळत नाही 2/3 वर्षानंतर नैसर्गिक रित्या  पालापाचोळा सडून तण व वेगवेगळ्या झाडाझुडपाचा काडीकचरा त्यांचे कास्ट या पासून ह्युमस तयार होतो व त्यापासून सेंद्रिय कर्ब ,त्यात जिवाणूंची  वाढ झाली की अशा लेव्हल केलेल्या जमिनीतून उत्पन्न मिळायला लागते.
  • वरील उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जे जमिनीतून उत्पन्न मिळते ते फक्त आणि फक्त जीवणूमुळेच मिळते, आणि म्हणूनच जैविक खतांचा वापर वाढवा उत्पन्न आपोआप वाढेल.
  • सेंद्रिय खते व जिवाणूंचा वापर वाढवा, तुमचे शेती उत्पन्न 30 % पेक्षा जास्त वाढेल हे मी खात्रीने सांगतो.

Wednesday, September 9, 2020

ह्युमिक ॲसिड


ह्युमिक ॲसिड :

ह्युमिक ॲसिड बद्दल जाणून घेण्यासाठी प्रथम ह्युमस म्हणजे काय हे जाणून घ्यायला हवं.

१. शेत जमीनीचा पहिला टप्पा चार भागांनी बनलेला असतो ज्यात ४५% अन्नद्रव्ये, २५% हवा, २५% पाणी, २% मृत जीव, २% ह्युमस व १% जीवजंतू जसे कि जिवाणूं, बुरशी व किडी ई.

२. ह्युमस निर्मिती हि एक न थांबणारी प्रक्रिया आहे ज्यामध्ये सर्व सेंद्रिय घटक जिवाणू, बुरशी व किडी यांकडून त्यांच्या मुळरूपात कुजविले जातात.

३. त्याचबरोबर खडकांचे नैसर्गिकरित्या व अन्नद्रव्यांचे लिथोट्रोपस या जंतूंमुळे विघटन होते आणि त्यानंतर या विघटित घटकांचे निरनिराळ्या स्वरूपात पुनर्घटन होते जसे कि ह्युमिन, ह्युमिक ॲसिड व फलविक ॲसिड ई.

४. ह्युमिक ॲसिड सूक्ष्मजीवांसाठी अन्न म्हणून भरपूर प्रमाणात कार्बन पुरविते त्यामुळे हेच सूक्ष्मजीव जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

५. परंतु मुख्यत्वे ह्युमिक ॲसिड एका गाडीसारखे काम करते जे जमिनीत असणारे सर्व अन्नद्रव्ये पिकाच्या पांढऱ्या मुळांकडे नेण्यास मदत करते.

६. ह्युमिक ॲसिड व अन्नद्रव्ये जसे कि पालाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, जस्त, तांबे, मंगल यांच्या परस्पर आकर्षण असल्याने हि अन्नद्रव्ये ह्युमिक ॲसिडच्या आवरणात आकर्षिले जातात. जसे कि आपण एखाद्या सुंदर गाडीकडे आकर्षिले जाऊन त्यात बसतो अगदी तसेच.

7. हि ह्युमिक ॲसिडची गाडी अन्नद्रव्ये वाहून नेऊ



न पिकाच्या पांढऱ्या मुळांकडे पोहचवितात व मुळे ती अन्नद्रव्ये स्वतःकडे ओढून घेतात.

8. हलक्या जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास अडचण होते कारण ते निचऱ्यावाटे वाहून जात असतात. त्यामुळे तेथे ह्युमिक ॲसिड वापरल्यास अन्नद्रव्ये कार्यक्षमरित्या उपलब्ध होतात व पिक जोमात येऊन उत्पादन वाढ होते.