Wednesday, September 23, 2020

बोर्डो मिश्रण कसे तयार कराल

 बोर्डो मिश्रण: 

  • बऱ्याच काळापासून आपण  बोर्डो मिश्रणचा वापर करत आहोत. बोर्डो मिश्रण हे एक चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक  आहे. इतर बुरशीनाशकांपेक्षा स्वस्त आहे. बोर्डो मिश्रण हे डाळिंब फळपिकांच्या बागेत फवारणी केल्यास संपूर्ण बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगावर नियंत्रण करते पण ते चांगल्या प्रकारे बनवने गरजेचे आहे. बोर्डो मिश्रण  फवारणी केल्यामुळे बागेतील कीडनियंत्रण होण्यासही मदत होते. बोर्डो मिश्रण हे नेहमीच ताजे बनवून लगेच फवारणी करावी.आज बनवलेले बोर्डो मिश्रण हे उद्या फवारणी करू नयेत.


  • 1% (एक टक्का) बोर्डो मिश्रण फवारण्या ह्या फक्त छाटणी झाल्यावर लगेच आणि विश्रांतीच्या काळातच कराव्यात.
  • 0.5% (आर्धा टक्का) बोर्डो मिश्रण फवारण्या ह्या फक्त बहार व्यवस्थापण काळातच कराव्यात.

बोर्डो मिश्रण आणि पेस्ट बनविन्याची पध्दत:

       1) 1% (एक टक्का) बोर्डो मिश्रण :

  • मोरचुद (Copper Sulphate) 1कीलो कुटुन/बारीक करून प्लास्टिकच्या बकेटीत 10 लिटर पाण्यात रात्रभर भिजवून घ्या. त्याच प्रमाणे चुना (Lime) पाण्याचा pH आणि चुन्याच्या शुध्दतेनुसार 250-400 ग्रँम  प्लास्टिकच्या  बकेटीत ,10 लिटर पाण्यात रात्रभर भिजवून घ्या. सकाळी जेव्हा तुम्हाला बोर्डो मिश्रण बनवायचे आहे तेव्हा सिमेंटच्या/प्लास्टिकच्या टाकीत 80 लिटर पाणी टाका नंतर रात्रभर भिजवलेले चुना आणि मोरचुद वेगवेगळे लाकडी काठीने चांगले ढवळून घ्यावे त्यानंतर दोन्ही द्रावणातील आर्धा आर्धा लीटर द्रावण वेगवेगळ्या प्लास्टिकच्या मग/भांड्यात मध्ये काढावे.उरलेले 9.5 लीटर चुन्याचे द्रावण ढवळून एका व्यक्तीने  घ्यावे आणि  9.5 लीटर मोरचुद द्रावण ढवळून एका व्यक्तीने  घ्यावे आणि 80 लीटर पाणी टाकलेल्या टाकीत एक सारखे ओतावे आणि एका एका व्यक्तीने लाकडी काठीने ते द्रावण एकजीव होईपर्यंत ढवळावे नंतर डीजीटल pH मिटरने किंवा pH पट्टीने pH पाहा pH कमी असल्यास आपण ठेवलेले आर्धा लीटर  चुन्याचे द्रावण ढवळून थोडे-थोडे 2-3 वेळा pH येन्यापर्यत ढवळून टाकावे.
  • pH जास्त असल्यास आपण ठेवलेले आर्धा लीटर  मोरचुदचे द्रावण ढवळून थोडे-थोडे 2-3 वेळा pH येन्यापर्यत ढवळून टाकावे आणि नंतर pH 6.9-7.1 आल्यानंतर फवारणी करावी.
  • जर तुमच्या कडे pH मिटर किंवा pH पट्टी नसेल तर चांगली स्वच्छ केलेली लोखंडी पट्टी/खिळा/खुरपे बोर्डो मिश्रणात एक मिनिटं बुडवून ठेवा नंतर बाहेर काढून  लोखंडावर जर लालसर तांब्यासारखा रंग आला तर त्या द्रावणामध्ये मोरचुद जास्त प्रमाणात आहे असे समजावे नंतर   आपण ठेवलेले आर्धा लीटर  चुन्याचे द्रावण ढवळून थोडे-थोडे 2-3 वेळा ढवळून टाकावे. पुन्हा एकदा लोखंडी पट्टी/खिळा/खुरपे बोर्डो मिश्रनात एक मिनिटं बुडवून ठेवा नंतर बाहेर काढून  लोखंडावर जर लालसर तांब्यासारखा रंग नाही आला तर तुमचे द्रावण फवारणी योग्य झाले असे समजावे.

       2)0.5% (आर्धा टक्का) बोर्डो मिश्रण :

  • मोरचुद (Copper Sulphate) कुटुन/बारीक करून 1/2 (आर्धा) कीलो/100ली पाण्यासाठी घ्यावा आणि त्या सोबत चुना (Lime) शुध्दतेनुसार 125-200ग्रँ/100ली पाण्यासाठी घ्यावा बाकी सर्व वरील पध्दतीने करावे.

       3)10%बोर्डो पेस्ट :

  • 10% बोर्डो पेस्ट ही वर्षातून दोनदा लावने गरजेचे आहे एकदा छाटणी सोबत/छाटणी झाल्यावर लगेच आणि दुसऱ्यांदा पावसाळा संपल्यावर लगेच सप्टेंबर ते आँक्टोबरमध्ये यामुळे खोडावर खोडकिडा किंवा खोड भुंगेरेचा प्रादुर्भाव होत नाही

  •  मोरचुद (Copper Sulphate) कुटुन/बारीक करून 1किलो/10 ली पाणी. 1किलो मोरचुद प्लास्टिकच्या भांड्यात 5 लिटर पाण्यात रात्रभर भिजवून घ्या. 
  • त्याचप्रमाणे चुना (Lime) 1 किलो/10 ली पाणी. 1किलो चुना प्लास्टिकच्या भांड्यात 5 लीटर पाण्यात रात्रभर भिजवून घ्या. 
  • सकाळी जेव्हा तुम्हाला बोर्डो पेस्ट बनवायचे आहे तेव्हा चुना आणि मोरचुदचे द्रावण ढवळून एकसारखे प्लास्टिकच्या भांड्यात ओतने व त्यात  क्लोरोपायरीफाँस 20 मिली किंवा ईमिडाकक्लोप्रिड 20 मिली टाकून लाकडी काठीने चांगले ढवळून घ्यावे त्यानंतर पेस्ट तयार होऊन लाकडी काठीवर थर चढल्यास चांगली पेस्ट तयार झाली समजुन झाडाचे वय आणि ऊंची नुसार खोडावर 1-2.5 फुट वरपर्यंत ब्रशने लावावी.

  • टिप - बोर्डो पेस्टचा pH पाहण्याची गरज नाही 

  • टिप - 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी फक्त बागेत विश्रांतीच्या काळात आणि छाटणी झाल्यावरच  करावी.
  • 0.5% बोर्डो मिश्रण फवारणी बाग फुलधारनेपासुन ते फळे काढणी पर्यंत महीन्यातुन एकदा करावी. यामुळे बागेतील सर्व बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोग नियंत्रण होण्यास मदत होते आणि औषधांची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होउ शकतो.

Friday, September 11, 2020

हे..! खते एकमेकांन मध्ये मिसळू नका


हे..! खते एकमेकांन मध्ये मिसळू नका:



खालील खतांच्या जोड्या आहेत त्या कधीही एकमेकात मिसळू नये.


(1)कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम सल्फेट


(2)कॅल्शीयम नायट्रेट - पोटॅशियम सल्फेट


(3)कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम फोस्फेट


(4)कॅल्शीयम नायट्रेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट


(5)कॅल्शीयम नायट्रेट - फोस्पेरिक एसिड


(6)कॅल्शीयम नायट्रेट - सल्फ्युरिक एसिड


(7)अमोनियम फोस्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट


(8)पोटॅशियम सल्फेट - अमोनियम सल्फेट


(9)कॅल्शीयम नायट्रेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज


(10)पोटॅशियम कलोराइड - पोटॅशियम सल्फेट


(11)पोटॅशियम सल्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट


(12)पोटॅशियम सल्फेट - सल्फुरिक एसिड


(13)अमोनियम फोस्फेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज 


(14) फोस्फरिक एसिड  - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज 

Thursday, September 10, 2020

निंबोळी पावडरचे गुणकारी उपयोग

 

निंबोळी पावडर:

 


  • निंबोळी पावडर मध्ये ‘अॅझाडीरेक्टीन’ घटक असल्यामुळे मातीमधील हुमणी, खोडकीड, कटवर्म, वाळवी विषाणु, बुरशी या शत्रूकिटकां-रोगांचा ते नायनाट करते.
  • निंबोळी पावडर  हे संपूर्ण नैसर्गिक स्वरुपामधील निंबोळी पावडर असल्याने जमिनीमधील कोणत्याही उपयुक्त जिवाणुंना हानी पोहचत नाही.
  • निंबोळी पावडर  हे रासायनिक खतांमध्ये मिसळून वापरल्याने *रासायनिक खतांमधील नत्र टिकून राहते.

  • निंबोळी पावडर  पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून 100% संरक्षण करते.
  • निंबोळी पावडर  मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते.
  • निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते.
  • निंबोळी पावडर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच मातीमधील ह्युमसचे प्रमाण वाढवून पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यास मदत होते.
  • निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीचा सामू चांगला राखला जातो. परिणामी ऊत्पादन व गुणवत्ता वाढते.

निंबोळी पावडरचा उपयोग कसा करावा :

  • सर्व पिकांमध्ये वापरास योग्य असणारी ही निंबोळी पावडर एकरी 200 किग्रॅ वापरण्याची शिफारस आहे.
  • फळबागेमध्ये वापर करायचा असल्यास 500 ग्रॅम प्रति झाडच्या प्रमाणामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत द्यावे.
  • सेंद्रिय, रेसिड्यूफ्री, नैसर्गिक, जैविक, एकात्मिक, रासायनिक इ. सर्व शेती प्रकारामध्ये वापराकरिता पूर्ण सुरक्षित आहे.

जिवाणू हाच शेतीचा आत्मा आहे


जिवाणू शेतीचा आत्मा:
          

  • आपल्या शेतीजमिनीत कोणतेही पीक उत्तम यायचे असेल तर "जमिनीची सुपकता" अत्यंत महत्वाची आहे.त्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात.
  • आपण शेतात चालताना शेतजमीन इतकी भुसभुशीत असली पाहिजे की त्या जमिनीवरून चालताना आपण गादीवरून चालत आहोत असा भास झाला पाहिजे, ती जमीन  सुपीक, अशा जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब उपलब्ध असतो,जिवाणूंची संख्या एक मूठभर मातीत 10 कोटी पेक्षा जास्त असते ,त्यात 70 /80 प्रकारचे जिवाणू असतात.
  • ज्या जमिनीचा सामू 6.5 आहे, ज्या जमिनीचा EC  0.5 च्या आत आहे, ज्या जमिनीची सेंद्रिय कर्बाची पातळी 0.8 च्या पुढे आहे, ज्या जमिनित क्षारांची पातळी योग्य आहे असे खुप महत्वाचे घटक आहेत, कि ज्यावर आपल्या जमिनीची सुपीकता, आणि उत्पादकता अवलंबून असते.आपण शेतीतून उत्पन्न घेतो, ज्याकाही पिकांचे आपण उत्पन्न घेतो त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या 16 अन्न घटकांची आवश्यकता असते.
  • पिकास आवश्यक असणारे " मूळ अन्न द्रव्ये - घटक " 16 आहेत. आपल्या सोयी साठी याचे 4  गट केलेले  आहेत. त्याची माहिती गेल्या 15/20 दिवसापासून आपण घेत  आहोत.
नैसर्गिक अन्न घटक :

         1 कार्बन 
         2 हैड्रोजन 
         3 प्राणवायु 

हे घटक नैसर्गिक रित्या हवा पाणी सूर्यप्रकाश यांच्या पासून उपलब्ध होतात.

मुख्य अन्न द्रव्ये:

        1 नत्र 
        2 स्फुरद
        3 पालाश.
 प्रमाण जास्त लागते म्हणून मुख्य अन्न द्रव्ये म्हणतात.


दुय्यम अन्न द्रव्य:  
        1 कैल्शियम 
        2 मैग्नेशियम 
        3 गंधक. 

मुख्य अन्न द्रव्याच्या मानाने खुप कमी पुरवावे लागतत् म्हणून म्हणून यांना दुय्यम अन्न द्रव्ये म्हणतात.

सूक्ष्म अन्नद्रव्ये:

         1 फेरस = लोह
         2 झींक = जस्त 
         3 कॉपर = तांबे  
         4 मंगेनिज 
         5 मोलाब्द 
         6 बोरॉन 
         7 निकेल 

ही 7 अन्न द्रव्ये , मुख्य आणि दुय्यम अन्न द्रव्याच्या मानाने खुप कमी किंवा अति सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात ,म्हणून याना सूक्ष्म अन्न द्रव्ये असे म्हणतात.
  • वरील 1 क्रमांकाचे अन्न द्रव्ये नैसर्गिक रित्या पिकास मिळतात . त्याची फारशी चिंता करावी लागत नाही. मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्न द्रव्ये या तिन्ही अन्न द्रव्यांच्या बाबतीत लक्ष्य द्यावे लागते.
  • 13 अन्न द्रव्ये जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात, ते वजा जाता आवश्यक अन्न द्रव्ये जमिनीला पुरवावी लागतात. हे पुरवलेले अन्न घटक जसेच्या तसे म्हणजे दिलेल्या स्वरुपात पिकास "अपटेक्" "शोषण" करता येत नाहीत. म्हणून या स्वरूपास "स्थिर स्वरूप" किंवा Fix Form असे म्हंटले जाते. ही अन्न द्रव्ये पिकास "अपटेक्" करण्या योग्य स्वरुपात रूपान्तर व्हावे लागतत्. हे रूपान्तरणाचे कार्य जमिनीतिल जीवाणु करीत असतात. या प्रकारच्या जीवाणुंची 'संख्या आणि कार्यक्षमता' ही अत्यंत महत्वाची असते. या साठी त्याना त्यांचे खाद्य योग्य प्रमाणात पुरवावे लागते. आणि ते म्हणजे  सेंद्रिय कर्ब होय. जमिनित सेंद्रीय कर्बाची पातळी योग्य असावी लागते. जी आपल्या कड़े फारच कमी आहे. (वर्षानु वर्ष सातत्याने होणारा रासायनिक खतांचा मारा याला कारणीभूत आहे )सरसरी 0.3 ते 0.5 एवढीच असते. ही पातळी वाढवणे साठी जैविक कर्ब द्यावा लागतो. जैविक  कर्ब हा सेंद्रिय खतातून उपलब्ध होत असतो.
  • जैविक खतामुळेच किंवा जीवणूमुळेच आपल्याला उत्पन्न मिळते आपल्या जमिनीत जिवाणू नसतील तर तुम्ही कितीही रासायनिक खते द्या उत्पन्न कमी मिळते.
  •  याचे एक उदाहरण ज्या जमिनीची लेव्हल केलेली असते त्या जमिनीत 2/3 वर्ष उत्पन्न मिळतच नाही, कारण जसे दूध तापवून थंड झाल्यावर त्याला साय येते, म्हणजे साय हा दुधाचा पौष्टीक पदार्थ असतो, तसे जमिनीत वरचा 1 विथचा जो थर असतो तो म्हणजे जमिनीचा पौस्टिक पदार्थ असतो, त्यातच सर्व प्रकाचे जिवाणू असतात  आणि हाच 1 विथ जमिनीचा थर लेव्हल केल्यामुळे खोल गाडला जातो व जिवाणू नसलेला मातीचा थर वर टाकला जातो .
  • रासायनिक पदार्थ ,सेंद्रिय कर्ब यांचा झाडाला पुरवठा करणारे जिवाणू उपलब्ध नसल्यामुळे ते पदार्थ झाडाला  ,पिकांना मिळत नाहीत आणि म्हणून लेव्हल केलेल्या जमिनीत 2/3 वर्ष उत्पन्न मिळत नाही 2/3 वर्षानंतर नैसर्गिक रित्या  पालापाचोळा सडून तण व वेगवेगळ्या झाडाझुडपाचा काडीकचरा त्यांचे कास्ट या पासून ह्युमस तयार होतो व त्यापासून सेंद्रिय कर्ब ,त्यात जिवाणूंची  वाढ झाली की अशा लेव्हल केलेल्या जमिनीतून उत्पन्न मिळायला लागते.
  • वरील उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जे जमिनीतून उत्पन्न मिळते ते फक्त आणि फक्त जीवणूमुळेच मिळते, आणि म्हणूनच जैविक खतांचा वापर वाढवा उत्पन्न आपोआप वाढेल.
  • सेंद्रिय खते व जिवाणूंचा वापर वाढवा, तुमचे शेती उत्पन्न 30 % पेक्षा जास्त वाढेल हे मी खात्रीने सांगतो.

Wednesday, September 9, 2020

ह्युमिक ॲसिड


ह्युमिक ॲसिड :

ह्युमिक ॲसिड बद्दल जाणून घेण्यासाठी प्रथम ह्युमस म्हणजे काय हे जाणून घ्यायला हवं.

१. शेत जमीनीचा पहिला टप्पा चार भागांनी बनलेला असतो ज्यात ४५% अन्नद्रव्ये, २५% हवा, २५% पाणी, २% मृत जीव, २% ह्युमस व १% जीवजंतू जसे कि जिवाणूं, बुरशी व किडी ई.

२. ह्युमस निर्मिती हि एक न थांबणारी प्रक्रिया आहे ज्यामध्ये सर्व सेंद्रिय घटक जिवाणू, बुरशी व किडी यांकडून त्यांच्या मुळरूपात कुजविले जातात.

३. त्याचबरोबर खडकांचे नैसर्गिकरित्या व अन्नद्रव्यांचे लिथोट्रोपस या जंतूंमुळे विघटन होते आणि त्यानंतर या विघटित घटकांचे निरनिराळ्या स्वरूपात पुनर्घटन होते जसे कि ह्युमिन, ह्युमिक ॲसिड व फलविक ॲसिड ई.

४. ह्युमिक ॲसिड सूक्ष्मजीवांसाठी अन्न म्हणून भरपूर प्रमाणात कार्बन पुरविते त्यामुळे हेच सूक्ष्मजीव जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

५. परंतु मुख्यत्वे ह्युमिक ॲसिड एका गाडीसारखे काम करते जे जमिनीत असणारे सर्व अन्नद्रव्ये पिकाच्या पांढऱ्या मुळांकडे नेण्यास मदत करते.

६. ह्युमिक ॲसिड व अन्नद्रव्ये जसे कि पालाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, जस्त, तांबे, मंगल यांच्या परस्पर आकर्षण असल्याने हि अन्नद्रव्ये ह्युमिक ॲसिडच्या आवरणात आकर्षिले जातात. जसे कि आपण एखाद्या सुंदर गाडीकडे आकर्षिले जाऊन त्यात बसतो अगदी तसेच.

7. हि ह्युमिक ॲसिडची गाडी अन्नद्रव्ये वाहून नेऊ



न पिकाच्या पांढऱ्या मुळांकडे पोहचवितात व मुळे ती अन्नद्रव्ये स्वतःकडे ओढून घेतात.

8. हलक्या जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास अडचण होते कारण ते निचऱ्यावाटे वाहून जात असतात. त्यामुळे तेथे ह्युमिक ॲसिड वापरल्यास अन्नद्रव्ये कार्यक्षमरित्या उपलब्ध होतात व पिक जोमात येऊन उत्पादन वाढ होते.

Thursday, August 27, 2020

डाळिंब शेती आणि माती परीक्षण

डाळिंब शेती आणि माती परीक्षण:




माती परीक्षण गरज:

  • आपण ज्या शेतीतून जमिनीतून पिके घेतो. त्या जमिनीचा प्रकार कोणता व त्या जमिनीत कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत,  या सर्व गोष्टींची माहिती करून घ्यायची असेल तर किमान 1 वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करणे गरजेचे असते फळबागांन विशेष महत्व आहे .  
  • माती परीक्षण ही शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात घेण्यात येणारे पीक नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. तसेच याने पीकांना द्यावयाच्या खताची मात्रा पण निश्चित करता येते. 
  • यामध्ये नत्र पालाश व स्फुरद या पोषक द्रव्यांचा दिलेल्या मातीच्या नमून्यात किती प्रमाण आहे हे बघितल्या जाते तसेच जमिनीतील विद्राव्य क्षार व जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक याचीही तपासणी केली जाते.
  • कोणत्या पिकासाठी किती अन्नद्रव्ये लागतात हे ठरविण्यासाठी मूलत: जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्याचा किती साठा आहे हे ठरविणे आवश्यक असते. त्यासाठी शेतात पिके घेण्यापूर्वी किंवा विशिष्ट पीकरचना ठरवण्यापूर्वी शेतातील मातीचे परीक्षण करणे महत्त्वाचे आहे.

पिकांची वाढ आणि अन्नद्रव्ये प्रमाण:

  • पिकांच्या वाढीसाठी अनेक अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. 
  1. सामू PH 
  2. विदयुत वाहकता EC
  3. चुनखड़ी CaCO3 
  4. सेंद्रिय कर्ब Organic Carbon
  5. नत्र N
  6. स्फुरद P
  7. पालश K 
  8. फेरस(आयर्न) Fe
  9. झिंक Zn 
  10. मॅगनीज् Mn
  11. सल्फर S
  12. Boron B
  • त्यापैकी एखादे जरी मातीत कमी किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम लगेचच झाडावर दिसून येतो जसे पाने पिवळी पडणे, पान गळणे शिरा सोडून इतर zपीकांची वाढ पूर्ण होत नाही. ती अन्नद्रव्ये मिळता आपोआपच खुंटलेली वाढ परत सुधारते. 
  • विशेषत: या अन्नघटकांचा वनस्पती वाढीच्या एखाद्या जैविक कार्यात प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे माती परिक्षण करणे आवश्यक असते. त्याद्वारे शेतक-यांना समजते की मातीत कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमान कमी आहे किंवा जास्त आहे.
  • मातीपरीक्षणामुळे आपल्याला जमिनीची सुपीकता व उत्पादकता किती आहे व कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणात घालावे याची माहिती मिळते.
  • माती परीक्षण केल्याने शेताच्या मातीत कोणत्या नेमक्या द्रव्याची/पीक पोषक तत्त्वाची किती मात्रा आहे हे कळते. त्यानुसार खते व इतर पोषक द्रव्यांची उपाययोजना करता येते व त्याने पीक उत्पादन वाढते. त्याने गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. याद्वारे शेतातील पिकाचे योग्य नियोजनाने सुमारे दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ प्राप्त करता येतो.
  •  पीक पेरणीपूर्वी जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाविषयी पूर्ण माहिती होते. त्यानुसार पिकांच्या लागवडीचे नियोजन करता येते. अन्नद्रव्यांच्या संतुलित मात्रा देऊन अनावश्‍यक खर्च टाळता येतो.
  • जमिनीचा सामू नियंत्रित (6.5 ते 7.5) ठेवून पिकांची अन्नद्रव्यांची शोषणक्षमता वाढवता येते.
  • माती परीक्षणामुळे पिकांच्या वाढीस आवश्‍यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा समतोल कायम राखता येतो. जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही ते कळले. 

मातीच्या नमून्याचे परीक्षण:

  • मातीच्या नमून्याचे प्रयोगशाळेत सामू PH , विदयुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3 , सेंद्रिय कर्ब OC, नत्र N, स्फुरद P, पालश K, फेरस (आयर्न) Fe, झिंक Zn, मॅगनीज् Mn,  सल्फर S, बोरान B यासाठी परीक्षण केले जाते.
  • फळबागेच्या जमिनीतून मातीचा नमुना घेताना दुपारची सावली ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी खड्डा घेऊन थरांप्रमाणे माती नमुना घ्यावा.

- उदा. हलक्या जमिनीतील 0.30 सेंमी किंवा यापेक्षाही कमी असल्यास तेवढ्या खोलीपर्यंत थरातील माती घ्यावी. मध्यम खोलीमधील जमिनीतील 0.30 सेंमी पहिला थर व 30 ते 60 सेंमी किंवा 45 सेंमी खोली असल्यास दुसरा थर 30 ते 45 सेंमीपर्यंतचा नमुना घ्यावा. असे दोन थरांतील माती नमुने तपासणीसाठी वेगवेगळे घ्यावेत.

डाळिंब तसेच इतर फळबाग पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती आसावी:

 डाळिंब तसेच इतर फळबाग पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती आसावी:

  1. क्लोरमेक्वाट क्लोराईड  : वाढ निंयञक.
  2. एन ए ए : नैसर्गीक गळ थांबवीणे.
  3. जि ए : पेशीची संख्या वआकार वाढविणे.
  4. नायट्रोबेंझीन : कळी व फुले काढणे.
  5. टायकंटेनाॅल : प्रकाश सश्लेषण वाढविणे.  
  6. ह्युमिक अॅसीड 6% : सुपीकता वाढविणे.
  7. ह्युमिक अॅसिड 12 %वर : पाढ-या मुळाची वाढ .
  8. बायो स्टिमुलंट : नविन पाते फुले लागणे व गळ कमी करणे .
  9. सुक्ष्म अन्नद्रव्ये : पिके पिवळी लाल करपा न येऊ देणे, पिकास पोषण देणे .
  10. स्टिकर : पानावरती औषधी पसरावणे चिकटविणे ,शोषण करणे.
  11. अमिनो अॅसीड : हिरवे व कोवळेपणा वाढविणे
  12. अँन्टीआॅक्सीडंट : झाडाला तारूण्य वाढविणे .
  13. प्रथम अन्नद्रव्ये : नञ, स्फुरद, पालाश .
  14. दुय्यमअन्नद्रव्ये : मॅग्नेशियम ,कॅल्शियम व गंधक


N:P:K - नत्र : स्फुरद : पालाश:


  • 19:19:19:-पिकाच्या जोमदार वाढीसाठी
  • 12:61:00:-फुटवा जास्त येण्यासाठी
  • 18:46:00:-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
  • 12:32:16:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी
  • 10:26:26 :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी
  • 00:52:34:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी
  • 00:00:50:- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी.

हे माहीत आहे का?

मित्रानो आपण वेगवेगळी खते पिकांना देत असतो, पण आपल्याला बऱ्याच खतांचे पिकावर कोणते परिणाम होतात त्यांचे कार्य काय याची माहिती नसते. म्हणून आज जाणून घेऊ

विद्राव्य खतांचे कार्य...

१९:१९:१९, २०:२०:२०-

  • या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात.या मध्ये नत्र अमाईड,अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो.या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो.

१२:६१:०-

  • या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो.तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो.

०:५२:३४-

  • या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य भरपूर आहेत. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे.डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते.
१३:०:४५-

  • या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात.यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. फुलोऱ्यानंतर च्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते.अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.या खतामुळे पाणी कमी असताना पिके तग धरू शकतात.

०:०:५०+१८-

  • या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात.पालाश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध सल्फेट भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते. पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते.हे खत फवारले अशकते.या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते.
१३:४०:१३-

  • पात्या ,फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते.व अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.

कॅल्शियम नायट्रेट -

  • मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात व शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.

२४:२४:०-

  • यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे.शाखीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.

डाळिंब फवारणीत काेन काेनते प्राेडक्ट मिक्स करु शकताे

काेन काेनते प्राेडक्ट मिक्स करु शकताे :


  • शेतकरी बंधूंनो,आपण आज रासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक जाणून घेणार आहोत.
  • कुठलेही कीटकनाशक खरेदी करताना सर्वसाधारण पणे त्याच्या टक्केवारीच्या मागे आपण EC/SC (इ.सी/ एस.सी) असे लिहिलेले पाहतो. त्याचे कारण व आपल्या फवारणी द्रावणावर त्याचा काय परिणाम होतो हे आपण जाणून घेवूया...
  1. ईसी(EC) (ईमल्सीफ्लूएबल कॉन्सट्रेशन) :

  • उदाहरणार्थ - ट्रायझोफॉस ईसी असते.
  • हे औषध ऑर्गानिक ऑईल सॉल्वंट म्हणजे पारदर्शी द्रवरूप स्वरूपात असते. त्याला पाण्यात टाकले असता ते पांढरे दुधी रंगाचे होते.
  • इसी औषध प्रकाराची चांगली गोष्ट म्हणजे हे औषध द्रव लवकर ऍक्टिव्ह किंवा मिश्रण होते.
  • ईसी प्रकारच्या औषधाची दुबळी बाजू म्हणजे यात  एकापेक्षा अनेक कीटकनाशके एकत्र केले तर त्याक्षणी आपल्या दुसऱ्या औषधाची पावर कमी होऊ शकते.
  • याकरिता शक्यतो इसी स्वरूपातील औषधे इसी टाईपच्या औषधांमध्येच मिक्स/एकत्र करा.
      2. SC (एस.सी.) सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशन-

  • एस.सी प्रकारातील औषध ही या प्रकारच्या औषधांची वरची ग्रेड किंवा सुधारित आवृत्ती आहे.
  • या केमिकल मध्ये औषधाची वेजिटेबल पावडर मिश्रण करतात व त्यापासून एस.सी प्रकारची औषधे तयार करतात.
  •  एस.सी प्रकारच्या औषधाचा फायदा एक होतो की त्यामधील औषधी केमिकल सुरक्षित होते व दुसऱ्या केमिकल मध्ये ते मिक्स होत नाही त्यामुळे शक्यतो याची रिअॅक्शन किंवा दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे आपण फवारणी करीत असलेले द्रव्य अधिक परिणामकारक होते.
  • एस.सी प्रकारच्या औषधाची एक समस्या आहे ती म्हणजे हे औषधी घट्ट, सफेद दुधी रंगात असते. ते औषध द्रवरूप होण्यास थोडा जास्त वेळ घेते. 
  • हा एवढाच या प्रकारच्या औषधांचा अवगुण आहे, पण यांची परिणामकारकता चांगली आहे त्यामुळे बहुतेक सर्व औषधे हे एस.सी स्वरूपात बनत आहेत.
  • अशा प्रकारे रासायनिक कीटकनाशकांचे वरील २ प्रकार आपण पाहिलेत. त्यानुसार आपण आपली कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घ्यावी. त्यामुळे आपल्या किटकनाशकाची परिणामकारकता वाढवू शकतो. तसेच आपल्या फवारणीचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते. यासाठी शेतकरी बंधुंनी कीटकनाशक खरेदी करताना योग्य ती माहिती जाणून घ्यावी.
  • आपण एससी व इसी(SC/EC) यातील फरक जाणून घेतला.आज आपण डब्ल्यू.डब्ल्यू./डब्ल्यू.एस. जी./डी.पी(WW/WSG/DP) या प्रकारच्या पावडर किंवा दाणेदार स्वरूपातील किटकनाशकांची माहिती पाहणार आहोत.

        3. डब्ल्यू.डब्ल्यू(WW):

  • या प्रकारची कीटकनाशके बाजारात मिळतात. यामध्ये (ऍसिफेट,बाविस्टीन) असे अनेक प्रकार आहेत. ही कीटकनाशके बनविताना सूक्ष्म पीओपी किंवा न्यूट्रल/निष्क्रिय चुना किंवा टाल्कम पावडर वापरली जाते.
  • या प्रकारची औषधे तयार करताना वरील चुना किंवा पीओपी हे वाहक द्रव्य म्हणून (कॅरियर मटरेल) वापरतात.यावर मूळ औषधातील रासायनिक द्रव्य एकत्र करून हे कीटकनाशक तयार केले जाते. 
  • आपण पाण्यात एकत्र केल्यानंतर त्यातील मुळ  रासायनिक द्रव्य पाण्यात सोल्यूबल/ विद्राव्य होते व आपणास योग्य तो परिणाम मिळतो. या कीटकनाशक प्रकारात वाहक किंवा कॅरियर मटेरियल चे प्रमाण 

          4. डब्ल्यू.एस.जी (WSG):(वाटर सोल्युबल ग्रॅन्युल्स) 

  • ही औषधे तयार करताना,त्याचे ग्राइंडिंग (बारीक कण) करताना त्याचे कण ड्रिप किंवा स्प्रे पंप यांच्या नोझल मधून पास होतील या प्रकारे  ग्राइंडर केलेली असतात.उदाहरणार्थ, सल्फर गंधक हे  WSG या स्वरूपात असते.
  • ते ड्रिप मधून किंवा स्प्रे पंप मधून जाण्यास किंवा स्प्रे करण्यात अडचणीचे ठरतात. त्यामुळे अशा प्रकारची कीटकनाशके वापरतांना फडक्याने वस्त्र गाळ किंवा गाळून घ्यावी व ती स्प्रे पंपामध्ये किंवा ड्रीप सिस्टीम सोडावी. 
  • त्यामुळे आपले होणारे नुकसान टळते व आपणास कीटकनाशकाचे अपेक्षित परिणाम मिळता

       5.एस.जी.(SG) :(सोल्युबल ग्रॅन्युल्स)

  • ही कीटकनाशके तयार करताना योग्य प्रमाणात स्टार्च व पीओपी यांचे मिश्रण कीटकनाशक टाकून नूडल्स/ शेवाया तयार केल्या जातात.त्या पाण्यात टाकल्या असता विरघळतात.
  •  उदाहरणार्थ -एक्टारा.

       6. डी.पी.(DP): (डस्टिंग पावडर) 

  • ही कीटकनाशके तयार करताना कॅरियर किंवा वाहक मटेरियल जास्त प्रमाणात वापरतात. कारण ही कीटकनाशके कोरड्या स्वरूपात डस्टर द्वारे पिकावर धुरळणी केली जातात.
  • यामुळे ही कीटकनाशके पाण्यात द्रावण शील असत नाही. यासाठी यांचा फवारणीसाठी उपयोग करू नये.
  • उदाहरणार्थ -फेनवलरेट ५ टक्के पावडर
  • बाजारात काही पावडर युक्त कीटकनाशकांमध्ये सूक्ष्म सिलिका अर्थात सिलिकॉन वापरले जाते. त्यामुळे त्या कीटकनाशकांचा चांगल्या प्रकारे परिणाम मिळतो,त्यामुळे बाजारात पावडर युक्त कीटकनाशके घेताना ती उपलब्ध असल्यास सिलिकॉन युक्त कीटकनाशके घ्यावी.
  • त्यामुळे पिकास अतिरिक्त सिलिकॉन मिळून पीके सशक्त होतात व कीटकनाशकाचे अपेक्षित परिणाम मिळतात.

खाली काही फवारणी औषधे दिली आहेत ते तुम्ही मिक्स करून वापरू शकता:

  • कर्जट +कॉपर
  • बाविस्टीन + कॉपर
  • रोको + अंट्राकाल
  • सिविक + अट्राकाल.
  • अमिस्टार + सिविक
  • कोबाल्ट सल्फेट + अंट्राकाल 
  • फॉलिओ गोल्ड + प्रोफाईट
  • बाविस्टीन + कुमान
  • रोको + कुमान 
  • किटाझीन + झेड७८
  • कॉपर + एम ४५
  • अक्रोबँट + पॉलिराम
  • इक्वेशन प्रो + कॉपर
  • सुडो + बँसिलस
  • रोको + कॅपटाप
  • कॅपटाप + डोमार्क
  • डोमार्क + सल्फर 
  • कान्टफ + कॅपटाप
  • रिडोमील + कॉपर
  • बोर्डो + सल्फर
  • फॉलिक्युर + सल्फर
  • फॉलिक्युर + रोको
  • फॉलिक्युर + अट्राकाल
  • स्कोर + कुमान
  • स्कोर + कवच
  • टिल्ट + स्कोर
  • टिल्ट + कुमान
  • मेलोडी डयुओ + टिल्ट
  • एलिऐट + सेक्टीन
  • एलिऐट + अंट्राकाल
  • एलिऐट + एम ४५
  • कॅराथेन + एम ४५
  • बाविस्टीन + एम ४५
  • सिवीक + एम ४५
  • फॅन्टीक एम + कॉपर
  • सिस्थेन + पो बायकार्बोनेट
  • डोमार्क + पो बायकार्बानेट
  • डोमार्क + एम ४५


-व्हायरस साठी नुसते स्प्रे करून चालत नाही. व्हायरस हा मुळी मार्फत सुद्धा झाडात प्रवेश करतो. त्यामुळे सगळ्यात पहिले झाडाची मुळी सुरु ठेवणे . त्यासाठी मुळीवर  काम करणे तितकेच गरजेचे असते. झाडाच्या मुळांना ऑक्सिजन चा पुरवठा  होणे तितकेच गरजेचे असते. 

-पांढरी माशी थ्रीप्स तुडतुडे यासाठी चांगले औषध स्प्रे करणे

 व्हाईट प्लाय

  • पेगासिस १ ग्रम
  • आसिटामिपीड ०.५ ग्रम
  • कराटे १ मिली
  • अक्टरा ०.५ ग्रम
  • बायो ३०३ १.५ मिली
  • बायो फ्युज ३ मिली
  • सोलोमन १ मिली
  • अलिका ०.५ मिली
  • असिफेट १ ग्रम
  • उलाला ०.४० ग्रम
  • ओशिन १ ग्रम
  • निबोळी अर्क २ मिली
  • टोटो १ मिली
  • सिनमॅक २ मिली

व्हायरस आला असेल तर ..

एक फॉर्म्युला पण चांगला आहे 

  • ओरिजिनल गीर गाईचे दूध 2ली + हळकुंड ची पावडर 250 ग्राम /100 ली पाणी  एकत्र करून असे दर 15 दिवसाला एक स्प्रे केला तर चांगला परिणाम बगायला मिळतो. ( हळकुंड घरी आणून पावडर करावी  रेडिमेड पावडर वापरु नये)

थ्रिप्स:

  • मावरिक ०.३ मिली 
  • कराटे १ मिली
  • रिजेन्ट २ मिली 
  • लेसेन्टा ०.३० ग्रम
  • कान्फीडोर १.२५ मिली
  • सोलोमन १ मिली
  • मोव्हन्टो एनर्जी १ मिली
  • डेलिगेट ०.७५ मिली
  • स्पिन्टार ०.५० मिली
  • रोगोर १ मिली

अळी:

  • ईमामेक्टीन ०.४ ग्रम
  • टाकुमी ०.५ ग्रम
  • कोरोजन ०.३० मिली
  • फेनवरलेट १ मिली
  • लार्विन १.५ ग्रम


डाळिंब पिकासाठी बुरशीनाशकांची निवड

डाळिंब पिकासाठी बुरशीनाशकांची निवड


महत्वाच्या सूचना :- 

1. पावसाळी किंवा दमट हवामानात सपर्क बुरशीनाशका चा वापर करावा...

2. स्वच्छ वातावरणात सिस्टेमेटिक बुरशीनाशकाचा वापर करावा....

3. प्रत्येक बुरशीनाशकात फ्रूट चार्जर 5 ते 7 ml + वाटर चार्जर 0.1 ml पर लीटर नियमित वापरावे. 

4. झाडावर दव किंवा पानी असल्यास एकरी लागणारा डोस आहे तेवढेच ठेवून पानी निम्मे घेवून दुप्पट वेगाने फवारणी करावी

5. औषधे मिसळण्या पूर्वी पाण्याचा पीएच तपासून फ्रूट चार्जर टाकून व लिंबू पिळून 7 वर आणावा.

6. सर्व बुरशीनाशक फवारणी सोबत फंगी क्लीनर 1ते 2 gm पर लिटर ने मिक्स करावे यामुळे पिकांची प्रतिकार शक्ति वाढून 100% कण्ट्रोल मिळतो. 

7. रोगची लक्षणे दिसल्यासच बुरशीनाशक घ्यावे , गरज नसल्यास केवळ आर्गेनिक किंवा कॉन्टॅक्ट चा वापर करावा. फ्लॉवरिंग मध्ये सिस्टेमेटिकचा(संपर्क रहीत बुरशीनाशकाचा) स्प्रे घ्यावा...

 कोणत्या हि फळा वरिल डागा साठी...

  • ब्लायटोक्स (कॉपर ऑक्सिक्लोराइड) 2 ते 2.5 gm
  •  कोसाइड 2000 ( कॉपर हैड्रोक्साइड) 1 gm
  •  M 45 (मैंकोजेब) 2 ते 3 gm
  •  झेड 78 (झायनेब) 2 ते 3 gm 
  •  कुमान एल (झायरम) 2 ते 3 ml 
  •  एंट्रकॉल (प्रोपिनेब) 2 ते 3 gm 
  •  कैप्टॉप ( कैप्टेन ) 2 ते 3 gm 
  •  कवच (क्लोरोथेलोनील) 2 ते 3 gm


सामान्य:- नियमित वापर


  • बाविस्टीन ( कार्बनडेझीम) 1 gm
  • टिल्ट (प्रोपिकोनेज़ोल)0.5ते 1ml
  • स्कोर (डीफेनेकोनेजोल) 0.5 ml
  • फोलिक्युर (टैबूकोनेज़ोल) 1 ml


 कमी तिव्रता असलेले साधारण प्रादुर्भाव वापर (कॉन्टॅक्ट व सिस्टेमेटिक)


  • साफ़ ( कर्बडेझीम + मैन्कोजेब) 2 ते 3 gm
  • रेडोमिल गोल्ड ( मेटालेक्झिल + मेंकोझेब ) 2 ते 3 gm 
  • ताक़त ( हेक्झाकोनेझोल+ कैप्टेन ) 2 ते 3 gm 
  • प्रोफाइलर (फ्लूपिकोलाइड + फोसेटील ) 1.5 ते 2.5 ml 
  • नेटिवो (टैबूकोनेज़ोल +ट्रीफलोझायस्ट्रोबिन) 0.5 gm
  • कस्टोडिया (टैबूकोनेज़ोल + ऐजोझायस्ट्रोबिन ) 1 ml


स्पेशल :- जास्त प्रादुर्भाव असल्यास वरिल बुरशीनाशकाचा वापर करावा..


  • कैब्रीओ टॉप (पायरक्लोस्ट्रोबिन  + मेटीराम ) 1 ते 1.5 gm
  • एक्रोबेट ( डायमेथोमॉर्फ़ + मैन्कोजेब) 1 gm
  • मेलोडी डुओ (इप्रोवह्यालीकारब + प्रोपिनेब) 2.5 ते 3 gm
  •  कर्झट (सायमोक्सीनिल + मैन्कोजेब) 2.5 gm
  •  इंफिनिटो (फ्लूपिकोलाइड + प्रोपेमोकार्ब-HCl) 2.5 ते 3 ml (☝एंथ्रेक्नोज दबका रोगासाठी)
  • रनमैन  (सायझोफॅमिड) 80 ml पर एकर ( कुज, करपा ,सड़ रोगासाठी ) वरिल बुरशी नाशकाचा रिझल्ट चांगला येतो.....

काही कमी खर्चात प्रचलित नावे आहेत घटक तोच असून व्यापारी नावे अनेक असू शकतात उदा . ब्लायटोक्स किंवा ब्लू कॉपर हे वेगवेगळ्या कंपनी चे प्रोडक्ट असले तरी घटक एकच आहे 

 त्यामुळे जे प्रभावी रिजल्ट देते व् स्वस्त आहे त्यांची निवड करावी 

अलीकडच्या काळात अनेक मेक इन इंडिया चे प्रोडक्ट मार्केट मध्ये आले आहेत खात्री करुण ते वापरता येवू शकतात !! 

वर दिलेले कोणताही एकच औषधीचा   एका वेळी वापर करावा...

फवारणी सकाळच्या वेळी घ्यावी.

डाळिंब झाडांवर आणि फळांवर बुरशीचा प्रादुर्भाव कसा होतो ?

 डाळिंब झाडांवर आणि  फळांवर बुरशीचा प्रादुर्भाव कसा होतो ?


बुरशीला स्वतःचे पोषण करण्यासाठी झाडात असलेली अन्नद्रव्ये खाणे गरजेचे असते . हीच अन्नद्रव्ये खाऊन बुरशीची वाढ होत असते . मात्र , बुरशीचा झाडावर नेमका कसा प्रादुर्भाव होतो याचे एक विशिष्ट प्रकारचे चक्र असते . ते कसे काम करते हे पाहूया : 

बुरशीचा झाडावर आणि फळांवर प्रादुर्भाव :

  •  झाडाच्या सभोवतालच्या वातावरणात बुरशीचे बीजाणू ( स्पोअर्स ) असतातच . हे बीजाणू झाडाच्या पानावर येऊन बसतात . ही फक्त एक सुरुवात असते . 
  • पानावर स्थिर झाल्यानंतर ही बुरशी एक चिकट पदार्थ बाहेर टाकते , ज्यामुळे हे बीजाणू पानाला घट्ट चिकटून बसतात . परिणामी , जोरदार पावसातदेखील ही बुरशी पानापासून वेगळी होऊ शकत नाही .
  • यानंतर बुरशीची वाढ सुरू होते . सर्वप्रथम हे बीजाणू पानातील पाणी घ्यायला सुरुवात करतात . बियांपासून जसे अंकुर फुटतात तशाच पध्दतीने बुरशीच्या बीजाणू पासून बुरशीचा जन्म होतो . या नवीनच जन्म झालेल्या बुरशीला अन्नाची फार गरज असते . ही बुरशी अन्न मिळवण्यासाठी बारीक धाग्यांसारखे तंतू ( hyphae ) इतस्ततः पसरवण्यास सुरुवात करतात . हे तंतू विशिष्ट प्रकारचे द्रव बाहेर टाकतात जेणेकरून झाडाचा तो भाग बुरशीसाठी खाण्यायोग्य होईल . यामुळे झाडाला मोठ्या प्रमाणात इजा होते . 
  • त्यानंतर हे तंतू झाडाच्या आतील भागांत प्रवेश करून हल्ला करतात . एखादी जखम किंवा पर्णछिद्रे यामधून देखील ते तंतू प्रवेश करतात . यानंतर ही बुरशी पेशींच्या आत किंवा दोन पेशींच्या मधील भागातून वेगाने वाढायला सुरुवात होते . यालाच आपण बुरशीचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग झाला असे म्हणतो . 
  •  यानंतर हीच बुरशी नवीन बीजाणू तयार करते आणि हे बीजाणू पानाच्या पृष्ठभागावर देखील तयार होतात . हेच बीजाणू पुन्हा हवेद्वारे इतरत्र उडून नवीन झाडांवर हल्ला करतात . 


बुरशीवरील उपाययोजना:

बुरशी  हे चक्र असेच सुरू राहते . म्हणून , आपल्याकडे बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास ती बुरशी कोणत्या अवस्थेला आहे याचा विचार करून स्पर्शजन्य की आंतरप्रवाही यापैकी कोणते ( किंवा दोन्हीही ) बुरशीनाशक वापरावे हे ठरवावे . हा विचार करून काम केल्यास आपले काम अतिशय प्रभावी होईल व अनावश्यक स्प्रे चे पैसेही वाचतील .

Monday, August 24, 2020

पाण्याचा Ph(सामू) व त्यामुळे फवारणीवर होणारे परिणाम

 

पाण्याचा Ph(सामू) चे पिकावरील फवारणीचे परिणाम :-

  • आज शेतकरी शेतीतील डाळिंब तसेच इतर पिकांवर अनेक प्रकारचे किटकनाषक, बुरशीनाशक, तणनाशक इत्यादी. औषध फवारता परंतु पाहिजे तसा औषधाचा रिजल्ट मिळत नाही. त्यामुळे पिक रोगांना बळी पडणे तसेच उत्पन्नात घट होणे असल्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.
  • कुठल्याही पिकावर फवारणी करत असताना फवारणी साठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा Ph(सामू) सर्व प्रथम तपासाने गरजेचे आहे.
  • Ph (सामू) योग्य ठेवल्यास पिकाकडून या द्रावणाचे शोषण चांगले होते.  कुठल्याही पिकावरील कीड व रोगाचे नियंत्रण चांगले मिळण्यास मदत होते. कीडनाशकाची क्रियाशीलताही अधिक काळ राहिल्याने अपेक्षित परिणामही चांगले मिळतात. मात्र, बहुतांश शेतकरी फवारणीसाठीच्या पाण्याच्या दर्जाकडे लक्ष देत नाहीत. 
  • पाण्याच्या स्रोतामध्ये औद्योगिक रसायने, शहरातील प्रदूषित पाणी इत्यादी. घटक मिसळले गेल्याने ते वापरण्यायोग्य राहत नाहीत. त्याचा Ph (सामू) 7 पेक्षा अधिक (7.5 ते 9 पर्यंत) असतो.


Ph(सामू) म्हणजे काय :-

  • Ph(सामू) म्हणजे पोटेन्शिअल ऑफ हायड्रोजन.
  • Ph(सामू) मूल्य किंवा सामू हे द्रावण आम्ल(Acidic) आहे की अल्कली (Alkaline) ते मोजण्याचे एकक आहे.



  • पाण्याचा Ph किंवा सामू हा 1 ते 14 मध्ये मोजतात.
  • पाण्याचा Ph(सामू) त्यातील धन भार किंवा ऋण भारीत आयनांच्या प्रमाणावरून ठरतो.
  • Ph मोजत असताने पाण्यामध्ये धन भाराचे प्रमाण अधिक असते ते पाणी आम्लधर्मीय (Acidic) असते. 1 ते 7  अंकापर्यंतचा Ph हा आम्लधर्मीय(Acidic) असतो.
  • ज्या पाण्यात ऋण आयनांचे प्रमाण अधिक असते, ते पाणी अल्कधर्मीय असते. 7 पासून पुढे 14 पर्यंतचा Ph हा अल्कधर्मीय (Alkaline) समजतात. 
  • पाण्याचा Ph 7 असेल तर उदासीन (Neautral) असते.

 

फवारणी योग्य पाण्याचा Ph(सामू) :-

  • फवारणी करण्या अगोदर आपण वापरत असलेल्या पाण्याचा Ph माहीत करून घेणे आवश्यक आहे. 
  • फावरणीला  वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा Ph(सामू) जर 8 ते 9 च्या दरम्यान असेल त्या पाण्यात फवारणीचे कुठलेही औषध टाकून केलेल्या द्रावणामध्ये  क्रिया हि जलद घडते. परिणामी अशा द्रावणाचे शोषण पिकांकडून कमी प्रमाणात होते. अपेक्षित परिणामही मिळत नाहीत. 
  • त्यामुळे फवारणीसाठी वापरलेल्या पाण्याचा Ph(सामू) योग्य म्हणजे 6 ते 7 च्या दरम्यान असावा म्हणजे या द्रावणाचे पिकाकडून चांगले शोषण होते. अशा पाण्यामध्ये मिसळलेल्या घटकाचे विघटन लवकर होते. या प्रक्रियेला अल्कलाइन हायड्राॅलिसीस’ म्हणतात.
  • फवारणी साठी वापरले जाणारे पाणी जास्त प्रमाणात आम्ल (Acidic) किंवा अल्कली (Alkaline) असेल तर परिणामी फवारणीचा पाहिजे तसा रिजल्ट मिळत नाही.


पाण्याचा Ph कसा स्थिर करावा-

साधारणपणे बोरवेल, विहीर, तळे इत्यादी. च्या पाण्याचा Ph 7 पेक्षा जास्त असतो. Ph 7.5 ते 8.5 असतो.   


1)पाण्याचा Ph 7 पेक्षा जास्त आहे तर...,

  • पाण्याचा ph कमी करण्यासाठी सायट्रिक ॲसिड किंवा घरगुती लिंबाचा वापर करतात.


 

Ph (सामू) कसा तपासावा:-

  • पाण्याचा पीएच तपासण्यासाठी लिटमस पेपरचा वापर केला जातो. मात्र त्यामुळे पाण्याचा नक्की सामू समजत नाही. बाजारात डिजीटल पीएच मीटर उपलब्ध आहे. त्याचा वापर केल्यास नेमका पीएच कळतो. Ph मीटर चा वापर करून आपण योग्य Ph चेक करू शकतो.

-पाण्याचा Ph (सामू) चेक करण्यासाठी खालील गोष्टींचा वापर करू शकतो,

1)लिटमस पेपर-  

  • लिटमस पेपर चा वापर करून पाण्याचा Ph(सामू) मोजता येतो.                                




2)Ph Meter .

  • Ph मीटर चा वापर करून पाण्याचा अचूक Ph चेक करू शकतो.



 

Friday, August 7, 2020

डाळिंब बागेतील विद्राव्य खतांचे नियोजन

फळ फुगवणीसाठी  ड्रीपचे वेळापत्रक :-

 


फळधारणा झाल्यानंतर लिक्विड ग्रेड कधी सोडाव्यात या विषयी माहिती ...

12/61/00
  •  या ग्रेड चा वापर साधारण फळ लिंबू आकारात असताना चालू करावा. फळ लिंबू आकार ते पेरू आकारात होईपर्यंत या ग्रेड चा वापर करावा.

13/40/13
  • फळ साधारण पेरू आकाराचे झाल्यावर या ग्रेड चा वापर करावा. फळ पेरू आकार ते फळ काढणीला एखादा महिना बाकी असेपर्यंत हि ग्रेड द्यावि.

00/52/34
  • बागेतील फळ काढणीला एखादा महिना बाकी असताना हि ग्रेड चालू करावी. 34% पोटॅश असल्याने शेवटच्या स्टेज मध्ये दाण्यांमध्ये साखर उतरून चांगला कलर व साईज होण्यास या ग्रेड चा फायदा होतो.

00/00/50
  • बागेतील फळ काढणीला 10-12 दिवस बाकी असताना या ग्रेड चा वापर चालू करावा. चांगला कलर व साईज या ग्रेड ने मदत होईल.


काही महत्त्वाचे मुद्दे -

वरील सगळ्या ग्रेड देण्या दरम्यान काही महत्वाच्या बाबी..
  • कुठलेही फळासाठी फुगवणीचे औषध सोडताना फळाची साल लूज आहे का बघा, नसेल तर आधी कॅल्शिअम बोरॉन वापरून साल लूज करावी हि फवारणी घ्यावी म्हणजे साल चांगली लूज होऊन फळ फुगवण होताना फळे तडकणार नाहीत. शिवाय स्टिम्यूलंट सोडल्यानंतर झाडाला ड्रिपवाटे चांगल्या प्रमाणात पाणी देण्यास विसरू नये.
  •  बागेला दर 21 दिवसातून ड्रीपवाटे कॅल्शिअम बोरोन देणे गरजेचे आहे.
  •  महिन्यातून एकदा मायक्रोनुट्रिअन्ट देणे फायदेशीर ठरते.
  •  एक लिक्विड ग्रेड संपल्यानन्तर मध्ये 3-4 दिवसाचा गॅप देऊन एखादी स्लरी देऊन नंतर पुढची ग्रेड चालू केली तर एकदम छान रिजल्ट भेटतील. स्लरी ने लिक्विड ग्रेड वाटे दिलेले NPK झाडाला पूर्णपणे अपटेक होतील. 
  •  ड्रिपच वेळापत्रक बनवून NPK MICRONUTRIENT STIMULANT सोडत गेलात तर झाडंदेखील सशक्त राहतात व तेल्या व मर सारख्या रोगांना देखील बळी पडत नाहीत. गरज आहे ती फक्त नियोजनपूर्वक काम करण्याची.

ज्या बागांमध्ये ड्रीपचे सर्व वेळापत्रक योग्य प्रकारे वरून देखील साईझ न होणे याला हलकी जमीन, कमी शेणखत किंवा जमिनीचा  सामू कारणीभूत असू शकतो. मागील अनेक लेखांमधून सेटिंग झाल्यांनतर ड्रीपचे वेळापत्रक काय आणि कसे असावे याबद्दल अनेकवेळा माहिती दिली आहे.ते वेळापत्रक वापरले तर नक्कीच चांगली साईझ होईल. 
वरील वेळापत्रक अवलंबले, जमिनीचा सामू पण योग्य आहे तरीही साईझ होत नसेल तर, 
काही दिवस रासायनिक खतांना विश्रांती द्यावी, आपल्या मातीचा रिपोर्ट काढून घ्यावा. खतांत असे अनेक घटक असतात कि जे मातीला चिटकून बसतात, अशा वेळी आपल्या जमिनीत जो घटक जास्ती आहे त्या जिवाणूंची स्लरी करून पिकाला द्यावी, म्हणजे  पिकाला लगेचच उपलब्ध होईल. 
१२/६१/००, ००/५२/३४ या बॅग सोडून झाल्यावर PSB फॉस्फोरस अपटेक बॅक्टरीया ची स्लरी करावी, ज्याने चांगल्या प्रकारे साईझ होईल. 
माल काढण्यास काही अवधी असताना ००/००/५० सोडून झाल्यानंतर KSB पोटॅश अपटेक बॅक्टरीया स्लरी करावी, ज्याने डाळिंबाची आणखी चांगल्या प्रकारे साईझ होऊन फळाला आतून बाहेरून एकसारखा गडद लाल रंग येतो व चकाकी वाढते.. आपल्यालाही कोणतेही कलरचे औषध सोडण्याची वेळ येणार नाही. 
त्यासाठी जर साईझ होत नसेल तर जिवाणू स्लरीचा वापर करून बघावा नक्कीच चांगले रिझल्ट आपल्याला मिळतील.

Thursday, August 6, 2020

तेल्याग्रस्त बागेत तात्काळ करायाच्या उपाययोजना





डाळिंबावरील तेल्या:

  • डाळिंबावरील तेल्या रोगावर अजूनही १००% कंट्रोल देणारे एकही औषध बाजारपेठेत उपलब्ध नाही.
  • कुणी तुम्हाला महागड्या किमतीत अशी औषधे देत असतील तर ते निव्वळ आपल्या या रोगाबद्दलचा अज्ञानीपणाचा फायदा घेऊन आपला खिसा भरत आहे असे समजावे.
  • मुखत्वे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होतो. बागेतील आद्रता, अतिरिक्त सिंचन,अस्वच्छता, झाडांची अति गर्दी व योग्य प्रकारच्या फवारणीचा अभाव इत्यादी कारणांमुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव बागेत वाढत जातो. 
  • तेल्या रोगासाठी लोक अतिरिक्त फवारणी करत जातात. एकामागून एक अँटिबायोटिक, विविध ऍसिड, इत्यादी बिनबुडाचे फवारणीचा वापर करतात.

  • तेल्या रोगामुळे झाड आधीच अशक्त झाले असताना अतिरिक्त फवारणीवर फवारणी करून झाड अजून कोमात घातले जाते. परिणामी रोगाचा प्रसार थांबण्याऐवजी तो वाढतच जातो.
  • लोक फवारणीवर जास्तीचा जोर देतात पण ड्रिपवाटे झाडाला अगदी कमी प्रमाणात खते देतात. म्हणजे फवारणीसाठी घेतलेल्या औषधांच्या १०% खर्च सुद्धा आपण ड्रीपवाटे सोडायच्या औषधांवर करत नाही. म्हणजे आपण डॉक्टर कडे गेलो तर डॉक्टर सांगतात औषध थोडे स्ट्रॉन्ग आहे, जेवण करा आणि मग घ्या .मग इथे झाडांना ड्रिपवाटे काही न देता सर्र एक स्ट्रॉन्ग फवारे मारले जातात.
  • काही शेतकरी पाहिले आहेत कि ज्यांचं ड्रिपच वेळापत्रक ठरलेले आहे. फवारणी ते परिस्थिती पाहून करतात. पाण्याचं सिंचन अगदी मापात करतात .रोज नियमित वेळेवर सिंचन आणि ड्रीपवाटे कोणते खत कधी द्याचे, किती प्रमाणात द्यायचे याचा सर्व हिशोब धरणाऱ्या अशा काही शेतकऱ्यांच्या बागेत एकही झाड मर रोगाने गेलेले नाही .किंवा आमच्या बागेत तेल्या रोगाचे फळ आणून टाका. आम्हाला आमच्या झाडांवर ग्यारंटी आहे, कि ते तेल्या रोगाला बळीच पडणार नाहीत..स्वतःच्या झाडांवर एवढा विश्वास असणारे पण खूप शेतकरी आहेत. म्हणजे एखाद्या अशक्त माणसाला रोगांची लागण लवकर होते पण आठवड्यात काही ना काही पौष्टिक खुराक खाणाऱ्या पहिलवान माणसाला रोगांची लागण लवकर होत नाही. आता आपल्याला आपली झाड पहिलवान करायची कि अशक्त ठेवायची हे आपल्या हातात...!
  • तेल्या रोगाचा खूपदा बाऊ डाळिंब बागायतदार लोकांमध्ये करून दिलेला आहे...याला ज्यांनी नवीन जे नवीन डाळिंब बागायतदार आहेत ते घाबरून जातात...या उलट जवळे कडलग,संगमनेर मधील बरेच शेतकरी ज्यांनी राहुरी डॅम लगत आद्रतेच्या भागात शेती घेतली आहे ते १०-१५ वर्षांपासून तेल्याची लागण असलेल्या ४०-५० एकराच्या बागा सांभाळून त्यातून भरघोस उत्पन्न घेतात. 
  • तेल्या रोगासाठी आपला सिंचन, ड्रिपवाटे खते, योग्य फवारणी, बागेतील स्वच्छता इत्यादींमधील ढिसाळपणा कारणीभूत ठरतो. तर रोगाची लागण होऊ नये..व झालीच तर योग्य व प्रामाणिक सल्ल्याचा अभाव इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरतात.
तेल्यासाठी पूर्व उपाययोजना:
  • तेल्यामुक्त रोपांची लागवड करा. २ रुपयांनी स्वस्त भेटतात म्हणून कुठूनही रोपे घेऊ नका. खात्रीच्या ठिकाणी रोगमुक्त रोपे घ्या. 
  • तेल्यायुक्त झाडांसाठी आपण योग्य बाहेर पकडावा. जेणेकरून पावसाळ्याआधी आपली बाग हार्वेस्ट होऊन जाईल.
  • डाळिंब बागेत योग्य व मातीच्या प्रकार, वाफसा नुसार योग्य सिंचन करा. 
  • डाळिंब बागेत ड्रिपवाटे खतांची योग्य मात्रा द्या. नत्रयुक्त खते, सूक्ष्म अन्नद्रवे, स्टिमुलंट्स चा वापर करा. त्यासाठी योग्य असे वेळापत्रक बनवून घ्या.
  • NPK युक्त खते वापरा. फवारणीच्या औषधांच्या खर्चाच्या १०% खर्च तरी ड्रिपसाठीच्या खतांसाठी करा. जेणेकरून झाड एकदम सशक्त राहील. 
  • ड्रीप साठी खते देताना खर्चात बचत करू नका. योग्य त्या प्रमाणातच डोसेस देत चला. 
  • बागेत १००% स्वच्छता ठेवा. हवा खेळती राहील याची काळजी घ्या. 
  • फवारणी परिस्थिती पाहून करा. भर उन्हात फवारणी टाळा, तसेच स्ट्रॉन्ग फवारे मारताना बागेला काही वेळ ड्रिपमधून पाणी द्या. 
  • खोडाला बोर्डोपेस्ट, छाटणीनंतर बोर्डो इत्यादी गोष्टी पाळत चला. 
  • ड्रिपवाटे जीवामृत, घरघुती तयार केलेल्या स्लरी इत्यादी कमी खर्चिक गोष्टी वापरत चला.
  • १००% शुद्ध निंबोळी पेंड, उत्तम कुजलेले खत व पॅसिलोमायसिस तसेच ट्रायकोडर्मा बुरशी एकत्र करून ८ ते १० दिवस त्यावर गुळाचे पाणी शिंपडून मग ,असे खत बागेला भरा. याने जमिनीतील जवळपास सर्वच बुरशीजन्य रोगांचा(मररोग,निम्याटोड) नायनाट होईल. या सर्व पूर्वउपायांमधील ड्रीपचे वेळापत्रक, सिंचन आणि स्वच्छता या तीन गोष्टींकडे मुख्यत्वे ध्यान द्यावे.
तेल्या आल्यानंतर उपाययोजना:
  • तेल्या आल्यांनतर कॉपरयुक्त फवारे ( कोसाइड, ब्लायटॉक्स, ब्लू कॉपर ) अधिक स्ट्रॅप्टोसायक्लीन ची योग्य प्रमाणात फवारणी करावी. 
  • कॉपर, कॅप्टन, कर्झेट, ताकत, स्कोर+कवच, कस्टोडिया इत्यादी फवारणी आलटूनपालटून घ्यावी. 
  • बागेत ४% कॉपर डस्ट ची धुरळणी करावी. 
  • बागेला अतिरिक्त सिंचन करणे टाळावे. मोकळे पाणी देणे टाळावे.
  • पावसाळ्यात फळछाटणी लवकर करून घ्यावी. व लगेचच १% बोर्डो ची फवारणी करून घ्यावी.
  •  तेल्या हि फवारणी घ्या .सुडोमोनास + बॅसिलस ...तेल्यासाठी अत्यंत प्रभावशाली अशी हि फवारणी. सुडोमोनास आणि बॅसिलस हे जिवाणू तेल्याच्या व अन्य अपाय करणाऱ्या बुरशींना खातात. पावसाळी आद्र्तायुक्त वातावरणात या जिवाणूंची खूप चांगली अशी वाढ होते. त्यामुळॆ केमिकलयुक्त फवारणीपेक्षा हि फवारणी अत्यन्त फायदेशीर ठरते. फक्त हि फवारणी अत्यन्त काळजीपूर्वक पद्धतीने बनवावी. फवारणीसाठी किती पाणी लागते या हिशोबात.. सुडोमोनास ५ मिली/लिटर व बॅसिलस २ मिली/लिटर या प्रमाणात वापरावे.
फवारणी तयार करायची पद्धत : 
  • फवारणीचा हिशोबात सुडोमोनास एक १० लिटर पाण्यात टाकावे त्यात १ लिटर ताक व अर्धा किलो गुळ टाकावा. तसेच बॅसिलस दुसऱ्या एका १० लिटर पाण्यात टाकावे व त्यात पण १ लिटर ताक व अर्धा किलो गूळ टाकावा. (ताक व गूळ जिवाणूंसाठी अन्न म्हणून काम करतात, व त्यांची संख्या झपाट्याने वाढविण्याचे काम करतात) वरील दोन्ही द्रावाने सावलीत, हवेशीर ठेवावी.फवारणीची टाकी माती टाकून स्वच्छ धुवून घ्यावी. 
  • २४ तासांनंतर फवारणीचा टाकीमध्ये दोन्ही १० लिटर जिवाणू द्रावणे टाकावीत. मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे व फवारणी करावी. १५ दिवसांच्या अंतराने याच्या दोन फवारणी घेतल्याने तेलासाठी प्रदीर्घ असा परिणाम या फवारणीने मिळते. अगदी वाजवी दरात हि फवारणी होते. फक्त सुडोमोनास व बॅसिलस हे ताजे जिवाणू औषधे घ्या. व वरील पद्दतीने औषध तयार करा.
  • तेल्यासाठी अनेक प्रकारचे बिनकामी औषधे, पोषक बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण योग्य सिंचन, ड्रिपवाटे योग्य खते, बागेतील स्वच्छता या गोष्टींची काळजी आपणच घेतली पाहिजे. विविध महागडी औषधे फवारणी करण्यापेक्षा तेवढ्या किमतीचे योग्य NPK खते, बायोस्टिम्यूलंटस बागेला ड्रीपवाटे देत चला, जेणेकरून आपले झाडे सशक्त राहून, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून ते अशा रोगांना बळीच पडणार नाहीत.
  • निराश होऊन तेल्यायुक्त बाग उपटण्यापेक्षा योग्य असा बहार धरून, वरील प्रकारे नियोजन करत चला अतिशय चांगल्या प्रकारचे उत्पन्न तुम्हाला यातून मिळेल यात कुठलीही शंका नाही....!!

तेल्या ग्रस्त बागेत डाळिंब तडकते असली तर  फवारणी: 

1)कॉपर १.५ ग्राम + ब्रोमोपॉल अर्धा ग्राम प्रति लिटर घ्या.

2)कॅप्टाफ १.५ ग्राम + कॉन्टाफ १ मिली प्रति लिटर घ्या. 

3)सुडोमोनास + बॅसिलस ची फवारणी देखील फायदेशीर राहील. 

  • वरील फवारणी करताना बागेला चांगल्या प्रमाणात ड्रीपने पाणी द्यावे व संध्याकाळच्या वेळेत शक्यतो फवारणी घ्यावि.पाणी देताना ते वाफसा स्थितीत द्यावे..पाटपाणी देणे टाळावे.
  • शेजारी तेल्याग्रस्त बाग असेल व त्यातही काही उपयुक्त फवारणी दोन्ही बागांत किंवा शेजारील तेल्याग्रस्त बागेत नसेल तर तेल्याचा प्रादुर्भाव वाढणे साहजिक आहे.
उपाययोजना करुनही रोगाचं प्रादुर्भाव वाढलाच तर खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ घालावा व तोटा अधिक प्रमाणात होत असेल झाडे काढून टाकून मध्ये एक दोन पिके घेऊन परत सशक्त डाळिंब झाडांची लागवड केलेली फायदेशीर राहील.

विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन कसे करावे.


विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन:



  • विश्रांतीच्या काळात बागेची काय काळजी घेतली पाहिजे या विषयी बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारणा केली...लिखाण करून संपवावा असा हा विषय नाही..पण खाली काही फवारणी व आणखी काही नियोजन सांगितले आहे...ते नीट अवलंबले तर निश्चितच चांगली फळधारणा होण्यास काहीही अडचण येणार नाही...!!
  • आधीच्या बहार मध्ये फळ निघून गेल्याने झाडांतील जवळपास सर्वच ताकत निघून गेलेली असते,परिणामी झाडाच्या काडीतील अन्नद्रव्ये स्टोरेज पूर्णतः संपलेले असते.
  • अशा वेळी फळ निघून बाग ताणावर सोडायच्या आधी झाडाला NPK खतांची योग्य अशी मात्रा द्यावी, जेणेकरून झाडात परत ताकत निर्माण होईल.
  • काही शेतकरी एकदा बागेतील फळ निघून गेले कि परत पुढची पानगळ करायच्या वेळीस बागेत येतात. मित्रहो असे ढिसाळ नियोजन चालत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं ठरलं तर बाळंतीण बाई 9 महिने बाळ आपल्या पोटात वाढविते..त्याच्या पोषणावर तिची सर्व ताकत खर्च होते..व डिलिव्हरी झाली कि आपण तिला खारीक खोबरे..इतर पोषणहार खाऊ घालतो जेणेकरून तिची कमी झालेली ताकत पुन्हा भरून येईल...मित्रहो इथे डाळिंबाचे झाड म्हणजे बाळंतीण आणि डाळिंब म्हणजे तिने 7 महिने सांभाळले बाळ....सांगायचं मतितार्थ एवढाच कि झाडाने सुद्धा 7 महिने स्वतःची ताकत खर्च करून डाळिंब सांभाळले आहे..त्यामुळे डाळिंब उतरून गेल्यावर सुद्धा झाडांना पोषणहार दिला गेलाच पाहिजे.
  • पानगळीनंतर झाडांनी फुटवा जास्त प्रमाणात फेकणे..फुले न निघने...निघालेल्या फुलांची ड्रॉपिंग होणे..मादीफुल न निघता नर फुलंच जास्ती प्रमाणात निघणे..हि सगळी डाळिंबाच्या काडीत कमी स्टोरेज असण्याची लक्षणे आहेत..!!

1) त्यामुळे आधीचा बहार संपल्यानंतर किंवा नवीन बहार सुरु करायच्या आधी झाडाला कमीत कमी एकरी 2 बॅग 18/46/00 व 1 बॅग 10/26/26 तरी टाकावी.
2) विश्रांती काळात 00/52/34-5ग्रॅम प्रति लिटर अधिक 00/00/50-5ग्रॅम प्रति लिटर ची फवारणी महिन्यातून एक दोन वेळा करावी. फुटवा कमी धावावा तसेच काडीतील स्टोरेज साठी हि फवारणी उपयुक्त ठरते.
3) विश्रांती काळात एखादया दोन साधी बुरशीनाशके/बोर्डो तसेच कीटकनाशकांची फवारणी करावी.
4) नवीन बहार धरायच्या आधी शेणखत टाकलेले खड्डे उकरून घ्यावे व जुन्या मुळीचा जारवा तुटेल या मापात खड्डा करावा.
5) चांगले कुजलेले शेणखतच बागेला भरा. शेणखत भरायच्या आधी त्यावर ट्रायकोडर्मा इत्यादी बॅक्टरीया वाढवून असे खत बागेस भरावे.
6) विश्रांती काळात झाडावरची सर्व फुले फळे तोडून टाकावीत.
7) बहार सुरु करायच्या आधी झाडाच्या खोडांना घेरू पेस्ट चोळून द्यावी.
 बाग लीक होऊन त्याला नवीन पालवी फुटायच्या आत छाटणी करून पानगळ मारून टाकावी.
9)चांगला फुलोरा निघणे व बागेचे पुढील नियोजन हे 80% छाटणीवर अवलंबून असते त्यामुळे छाटणीसाठी 2 रुपये जास्ती जाऊद्या पण छाटणी करणारे प्रशिक्षितच पहा...नाहीतर 2 रुपये झाडाने स्वस्त छाटणी घेणारे 2 मिनिटात जी काडी तयार होण्याला 2 वर्ष लागली अशी काडी छाटून टाकतात. त्यांच्या डोक्यात छाटनी कमी पण झाडाची छत्री कशी होईल एवढेच बघतात.
म्हणून ज्यांना छाटणीमध्ये कोणती काडी ठेवायचीय कोणती काढायचीय हे कळते अशेच छाटणीवाले बघा.

10) विश्रांती काळात फळ उतरून गेला कि लगेच झाडाचे पाणी तोडू नका. शेवटी जर चार तास पाणी चालत होते तर काही दिवस साडेतीन तास नंतर तीन तास नंतर दोन तास नंतर एक अर्धा असं करत पाणी तोडा. साधारण बागेला 45-60 दिवसाचा ताण दिला तर योग्य राहील.

11) पानगळ करायच्या एक महिना आधी खाली सांगितलेली फवारणी 5 दिवसांच्या अंतराने 3 वेळा मारा. अतिशय उत्कृष्ट असे रिजल्ट तुम्हाला कमी फुटवा, मादीफूलांची संख्या जास्त,कमी फुल ड्रॉपिंग, व फुलांचा स्ट्रोक चांगला या स्वरूपात जाणवतील.
  1. गूळ - 5ग्रॅम/लिटर.
  2. DAP - 4ग्राम/लिटर.
  3. 13/00/45- 3ग्राम/लिटर.
  4. कॅल्शिअम नायट्रेट- 2ग्राम/लिटर.
  5. सल्फर - 1ग्राम/लिटर.
  6. बोरॉन - 0.5ग्राम/लिटर.
  • वरील औषधे वरील प्रमाणातच वरील क्रमानेच टाकीत टाकावीत. प्रमाण व औषधांत तसेच टाकीत टाकण्याच्या कर्मात कुठलाही बदल करू नये . तयार झालेला साका 5 दिवसांच्या अंतराने 3 वेळा फवारणी घ्यावी व नंतर पानगळ करावी.
  • वरील प्रमाण हे एकवेळच्याच फवारणीचे आहे. म्हणजे पुढील फवारणीच्या वेळी वरील औषधे वरील प्रमाणात टाकून नवीन साका तयार करावा.
  • तसेच वरील औषधांपैकी १८/४६ जेवढ्या प्रमाणात लागणार असेल तेवढेच फक्त आधीच्या दिवशी भिजत ठेवावे, बाकी औषधे फवारणीच्या वेळी त्या दिवशी टाकले तरी चालेल.

12) इथ्रेल ची योग्य प्रमाणात फवारणी करावी. ज्या बागांना पानगळ आधी जास्त ताण असेल त्यांनी पानगळ फवारणीच्या दिवशी बागेला 15-25 मिनिटे पाणी सोडावे.ज्या बाग पानगळ दिवशी देखील ४०-५०% पाने शिल्लक आहे त्यांनी पानगळ दिवशी पाणी देण्याचे गरज नाही.

  • विश्रांती काळात अनारकिंग नवसंजीवनीचा वापर केला तरी चालेल, त्याने विश्रांती काळात जे डोस टाकलेले आहे त्यांचे अपटेक होईल व काडीतील स्टोरेज वाढत जाईल. नियोजन असे असावे कि ज्यावेळी डोस टाकून, नवसंजीवनी देऊन खतांचे अपटेक वाढेल...व काडीतील स्टोरेज वाढून मग अतिरिक्त स्टोरेज फुटव्यांवाटे बाहेर पडेल त्यावेळी विश्रांती काळातील फवारणी चालू करून मग ते फुटवे वाढ थांबून मग काडीकडे स्टोरेज वळवले जावे.
  • त्याआधीच तुम्ही विश्रांती काळातील फवारणी चालू करू नये. बागेला/झाडांना बाग खाली झाल्यानंतर थोडा मोकळा वेळ द्यावा,त्यांना त्यांच्या कलाने थोडे वाढू द्यावे त्यांतील स्टोरेज वाढून द्यावे व मग नंतर फवारणी चालू करा म्हणजे स्टोरेज योग्य पद्धतीत वाढेल. 

डाळिंब शेतीवरील सततच्या व अवकाळी पाऊसाने उद्भवणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना


डाळिंब शेती सततचा व अवकाळी पाऊस

सततच्या तसेच अवकाळी पावसामुळे डाळिंब शेतीत अमाप नुकसानाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी काही उपाययोजना.

१)पानगळ करणे-

शेतकरी पानगळ करत असताने अनेक समस्यांना सामोरे जातात सततचा पाऊस असल्या कारणाने अनेक वेळा पानगळ पाहिजेतशी होत नाही. 

पानगळ हि पावसाळ्यात 15 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर या दरम्यान करतात. बरेच शेतकरी सप्टेबर मध्ये पाणी देतात. बऱ्याच शेतकऱ्यांची पानगळ यादरम्यान राहून जाते.



पानगळ उपाययोजना :-

  • डाळिंब बागेचे पाने जर 25-30% पेक्षा जास्त बाग लिक झाली नसेल तर पानगळ त्यादरम्यान केली तरी चालेल. 
  • बागेला पूर्ण विश्रांती दिलेली असेल तर पानगळ करताने पाण्याचे व इथ्रेल चे प्रमाण वाढून घावे व पानगळ करावी.
  • काही बागा लिक होऊन 30% पेक्षा जास्त नवीन पाने निघाली असतील व फुले निघण्याची काही शक्यता नसल्यास एक महिना ते दीड महिना थांबून पानगळ करून घ्यावी.
  • जर बागेची पानगळ  न करता  पालवी निघाली असेल व फुलकळी काही प्रमाणात दिसत असेल तर त्यासाठी योग्य ती फवारणी घेणे.

काही महत्वाचे मुद्दे-

  • सततचा पाऊस तसेच वातावरण साफ नसेल तर पानगळ शक्यतो टाळावी कारण साफ वातावरण नसेल तर पानगळ चांगल्या प्रकारे होणार नाही. वातावरण साफ झाले कि मगच पानगळ करावी.
  • आपल्या बागेला किती नवीन पालवी आहे यानुसार पानगळ करावी कि नाही हे ठरवावे. बाग लिक होऊन पालवी निघाली असेल व फुलकळी काही प्रमाणात दिसत असेल तर त्यासाठी योग्य ती फवारणी घेणे.
  • पानगळ करताना करताने काही गोष्टींकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. धुके, दैवर, झाडाच्या पानांवर  पावसाचे पाणी नसताना मारावी, व फवारणीसाठी नेहमीपेक्षा अधिक 50 ते 60 लिटर जास्त पाणी घेऊन सावकाश पानगळ करावी जेणेकरून परत पानगळ करण्याची गरज पडणार नाही. अशाप्रकारे पानगळ केली तर पानगळ चांगल्या प्रकारे होइल.

२)पानगळ नंतर चे व्यवस्थापन :-


  • नवीन पानगळ केलेल्या बागांनकडे विशेष लक्ष देणे तितकेच मगहात्वाचे असते. झाडांच्या पानांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कारण पाने चांगली राहिली तरच झाडांना फुले व्यवस्थित निघतील त्यामुळे पानगळ नंतर चौकी अवस्थेतील ज्या बाग असतील त्यांनी पानांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 
पानांवर डाग पडू नये उपयोजना-
  • पानांवर कुठल्याही प्रकारचे डाग पडू नये त्याकरिता खालील पैकी किमान दोन फवारणी घ्या , नंतर साधी-साधी फवारणी सुरू ठेवा जेणे करून पानांवर डाग पडणार नाहीत आणि परिणाम चांगला मिळेल.

1)Natio 0.5 ग्राम/लिटर
2)Blue Coper 2.5 ग्राम/लिटर  + streptocycline 50 ग्राम/200 लिटर. 
3)Cabrio top 2.5-3 ग्राम/लिटर.
4)Aliette 1 ग्राम/लिटर + Antracol 2 ग्राम/लिटर
  • ज्या बागांची नवीन पानगळ केली आहे. अशा बागांना ड्रीपने तसेच स्प्रे मधून N.P.K. आणि मिक्स माइक्रोन्यूट्रिएंट दिलेले फायदेशीर राहते.

बागेत फुलकळीच निघत नाही उपयोजना:
  • बागेत जर फुलकळी पाहिजे त्या प्रमाणात निघत नसेल तर खालील उपाययोजना करणे फायदेशीर राहील.
       ड्रीपद्वारें देणे:
  • ड्रीपने 4 ते 5 kg. सल्फर एकदा व 5 kg 00:52:34 दोन वेळा सोडावे. म्हणजे फुलकळी निघण्यास मदत होईल.
       फवारणी देणे:
  • बागेत खालील प्रमाणे फवारणी घेतली तर फुलकळी निगण्यास मदत होईल.
1) 00:52:34  2.5 ग्राम/लिटर ची एक फवारणी घ्यावी.
2)बोरॉन 1 ग्राम/लिटर + माइक्रोन्यूट्रिएंट 1 ग्राम/लिटर.

बागांमधील फुटावा :
  • बागेत फुटवा जास्त प्रमाणात निघतो त्यामुळे झाड जर  गच्च भरले तर परिणामी फवारणी नीट बसत नाही तसेच फळाला अन्नपुरवठा कमी होतो.
  • बागेत फुटवा जास्त निघत असेल तर पाणी कमी करावे. तसेच फुटवा काढून घेणे देखील योग्य राहील तसेच खालील उपयोजना करने फायद्याचे राहील.
        ड्रीपद्वारें देणे:
  • 00:52:34, 5 किलो ड्रीपद्वारे सोडावे .
        फवारणी देणे:
  • खालील पैकी 1-2 फवारणी घेणे योग्य राहील.
1)0:52:34 2.5 ग्राम/लिटर
2)Tilt 0.5 मिली/लिटर + Cuman-L 2.5 मिली/लिटर.
3)Planofix 0.5 मिली/लिटर + Boron 1.5 ग्राम/लिटर.

 

 3)फुलकळी अवस्था-



  • फुल अवस्थेत जर पाऊस झाला तर खते तसेच पाणी काही प्रमाणात सुरू ठेवा.
  • बाग सध्या फुलोऱ्यात आहे. त्यांनी खालील गोष्टीकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे,
1)फुलांची गळ होणार नाही. 
2)फुलांवर डाग येणार नाही. 
3)पानांवर डाग येणार नाही.
4)झाडांची मुळी चांगली सुरु राहील इत्यादी.

 

          फुल व पानांवरील डाग उपयोजना:

  • काही बागांमध्ये फुलांवर तसेच पानांवर डाग पडणे असल्या समस्या फुलोऱ्यात उदभवतात डाग येणे बंद व्हावे तसेच नवीन फुलांवर व पानांवर येणे बंद व्हावे यासाठी खालील काही फवारणी घेऊ शकता.
  • खालील फवारणी डाग येऊ नयेत म्हणून सुद्धा उपयुक्त राहातील.
1)Natio 0.5 ग्राम/लिटर.
2)Score 0.5 मिली/लिटर + kavach 1.25 ग्राम/लिटर.
3)Blue Coper 2.5 ग्राम/लिटर  + streptocycline 50 ग्राम/200 लिटर. 
4)Aliette 1 ग्राम/लिटर + Antracol 2 ग्राम/लिटर 
5)Contaf 1 मिली/लिटर+ captaf 2.5 ग्राम/लिटर 

 

बारीक फुल जळत आहे उपयोजना :

  • काही बागांमध्ये फुल कुणी जळून गळते असल्या समस्या साठी खालील पैकी एक फवारणी घेणे फायदेशीर राहील,

        
        1)Roko 1 ग्राम/लिटर + Cuman-L 2.5 मिली/लिटर.
        2)Bavistin 1 ग्राम/लिटर + Cuman-L 2.5 मिली/लिटर.
        3)Natio 0.5 ग्राम/लिटर. 

         झाडाची पांढरी मुळी:
  • काही बागांमध्ये  पांढऱ्या मुळी दिसत नाही अश्या बागांना सल्फर 4 ते 5 किलो/एक्कर ड्रीप ने द्यावे जेणे करून पांढरी मुळी चांगली चालण्यास मदत होईल.

4)बागेच्या सेटिंग नंतर (फळ लिंबू आकाराचे झाले आहे)

 
  • पावसाळ्यात  येणारा पाऊस तसेच वातावरण ढगाळ असेल तर बागेमध्ये फळांवर डाग येऊ नये म्हणून खालील फवारणी घेत चला .
  • सतत  एका मागे एक खालील फवारणी घेतली तरी नंतर बुरशी रोगराई कंट्रोल होत नाही. त्याकरिता 2-3 साध्या फावारण्या झाल्या की मग खालील एक फवारणी घ्या.
1)Natio 0.5 ग्राम/लिटर.   
2)Score 0.5 मिली/लिटर + kavach 1.25 ग्राम/लिटर.
3)Contaf 1 मिली/लिटर + captaf 1.50 ग्राम/लिटर.
4)Score 0.5 मिली/लिटर. + Kocide 1 मिली/लिटर.  
5)custodia 1.25 मिली/लिटर.
6)Blue Coper 2.5 ग्राम/लिटर + Bromopol 50 ग्राम/200 लिटर
7)Kitazin 1 मिली/लिटर + M45 2 ग्राम/लिटर.

  • बागेमध्ये सतत खूप प्रमाणात पाऊस होत असेल तर कॉपर+सल्फर ची डस्टिंग बेडवर करणे फायद्याचे राहील.