Thursday, August 27, 2020

डाळिंब शेती आणि माती परीक्षण

डाळिंब शेती आणि माती परीक्षण:




माती परीक्षण गरज:

  • आपण ज्या शेतीतून जमिनीतून पिके घेतो. त्या जमिनीचा प्रकार कोणता व त्या जमिनीत कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत,  या सर्व गोष्टींची माहिती करून घ्यायची असेल तर किमान 1 वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करणे गरजेचे असते फळबागांन विशेष महत्व आहे .  
  • माती परीक्षण ही शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात घेण्यात येणारे पीक नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. तसेच याने पीकांना द्यावयाच्या खताची मात्रा पण निश्चित करता येते. 
  • यामध्ये नत्र पालाश व स्फुरद या पोषक द्रव्यांचा दिलेल्या मातीच्या नमून्यात किती प्रमाण आहे हे बघितल्या जाते तसेच जमिनीतील विद्राव्य क्षार व जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक याचीही तपासणी केली जाते.
  • कोणत्या पिकासाठी किती अन्नद्रव्ये लागतात हे ठरविण्यासाठी मूलत: जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्याचा किती साठा आहे हे ठरविणे आवश्यक असते. त्यासाठी शेतात पिके घेण्यापूर्वी किंवा विशिष्ट पीकरचना ठरवण्यापूर्वी शेतातील मातीचे परीक्षण करणे महत्त्वाचे आहे.

पिकांची वाढ आणि अन्नद्रव्ये प्रमाण:

  • पिकांच्या वाढीसाठी अनेक अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. 
  1. सामू PH 
  2. विदयुत वाहकता EC
  3. चुनखड़ी CaCO3 
  4. सेंद्रिय कर्ब Organic Carbon
  5. नत्र N
  6. स्फुरद P
  7. पालश K 
  8. फेरस(आयर्न) Fe
  9. झिंक Zn 
  10. मॅगनीज् Mn
  11. सल्फर S
  12. Boron B
  • त्यापैकी एखादे जरी मातीत कमी किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम लगेचच झाडावर दिसून येतो जसे पाने पिवळी पडणे, पान गळणे शिरा सोडून इतर zपीकांची वाढ पूर्ण होत नाही. ती अन्नद्रव्ये मिळता आपोआपच खुंटलेली वाढ परत सुधारते. 
  • विशेषत: या अन्नघटकांचा वनस्पती वाढीच्या एखाद्या जैविक कार्यात प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे माती परिक्षण करणे आवश्यक असते. त्याद्वारे शेतक-यांना समजते की मातीत कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमान कमी आहे किंवा जास्त आहे.
  • मातीपरीक्षणामुळे आपल्याला जमिनीची सुपीकता व उत्पादकता किती आहे व कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणात घालावे याची माहिती मिळते.
  • माती परीक्षण केल्याने शेताच्या मातीत कोणत्या नेमक्या द्रव्याची/पीक पोषक तत्त्वाची किती मात्रा आहे हे कळते. त्यानुसार खते व इतर पोषक द्रव्यांची उपाययोजना करता येते व त्याने पीक उत्पादन वाढते. त्याने गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. याद्वारे शेतातील पिकाचे योग्य नियोजनाने सुमारे दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ प्राप्त करता येतो.
  •  पीक पेरणीपूर्वी जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाविषयी पूर्ण माहिती होते. त्यानुसार पिकांच्या लागवडीचे नियोजन करता येते. अन्नद्रव्यांच्या संतुलित मात्रा देऊन अनावश्‍यक खर्च टाळता येतो.
  • जमिनीचा सामू नियंत्रित (6.5 ते 7.5) ठेवून पिकांची अन्नद्रव्यांची शोषणक्षमता वाढवता येते.
  • माती परीक्षणामुळे पिकांच्या वाढीस आवश्‍यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा समतोल कायम राखता येतो. जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही ते कळले. 

मातीच्या नमून्याचे परीक्षण:

  • मातीच्या नमून्याचे प्रयोगशाळेत सामू PH , विदयुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3 , सेंद्रिय कर्ब OC, नत्र N, स्फुरद P, पालश K, फेरस (आयर्न) Fe, झिंक Zn, मॅगनीज् Mn,  सल्फर S, बोरान B यासाठी परीक्षण केले जाते.
  • फळबागेच्या जमिनीतून मातीचा नमुना घेताना दुपारची सावली ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी खड्डा घेऊन थरांप्रमाणे माती नमुना घ्यावा.

- उदा. हलक्या जमिनीतील 0.30 सेंमी किंवा यापेक्षाही कमी असल्यास तेवढ्या खोलीपर्यंत थरातील माती घ्यावी. मध्यम खोलीमधील जमिनीतील 0.30 सेंमी पहिला थर व 30 ते 60 सेंमी किंवा 45 सेंमी खोली असल्यास दुसरा थर 30 ते 45 सेंमीपर्यंतचा नमुना घ्यावा. असे दोन थरांतील माती नमुने तपासणीसाठी वेगवेगळे घ्यावेत.

डाळिंब तसेच इतर फळबाग पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती आसावी:

 डाळिंब तसेच इतर फळबाग पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती आसावी:

  1. क्लोरमेक्वाट क्लोराईड  : वाढ निंयञक.
  2. एन ए ए : नैसर्गीक गळ थांबवीणे.
  3. जि ए : पेशीची संख्या वआकार वाढविणे.
  4. नायट्रोबेंझीन : कळी व फुले काढणे.
  5. टायकंटेनाॅल : प्रकाश सश्लेषण वाढविणे.  
  6. ह्युमिक अॅसीड 6% : सुपीकता वाढविणे.
  7. ह्युमिक अॅसिड 12 %वर : पाढ-या मुळाची वाढ .
  8. बायो स्टिमुलंट : नविन पाते फुले लागणे व गळ कमी करणे .
  9. सुक्ष्म अन्नद्रव्ये : पिके पिवळी लाल करपा न येऊ देणे, पिकास पोषण देणे .
  10. स्टिकर : पानावरती औषधी पसरावणे चिकटविणे ,शोषण करणे.
  11. अमिनो अॅसीड : हिरवे व कोवळेपणा वाढविणे
  12. अँन्टीआॅक्सीडंट : झाडाला तारूण्य वाढविणे .
  13. प्रथम अन्नद्रव्ये : नञ, स्फुरद, पालाश .
  14. दुय्यमअन्नद्रव्ये : मॅग्नेशियम ,कॅल्शियम व गंधक


N:P:K - नत्र : स्फुरद : पालाश:


  • 19:19:19:-पिकाच्या जोमदार वाढीसाठी
  • 12:61:00:-फुटवा जास्त येण्यासाठी
  • 18:46:00:-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
  • 12:32:16:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी
  • 10:26:26 :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी
  • 00:52:34:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी
  • 00:00:50:- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी.

हे माहीत आहे का?

मित्रानो आपण वेगवेगळी खते पिकांना देत असतो, पण आपल्याला बऱ्याच खतांचे पिकावर कोणते परिणाम होतात त्यांचे कार्य काय याची माहिती नसते. म्हणून आज जाणून घेऊ

विद्राव्य खतांचे कार्य...

१९:१९:१९, २०:२०:२०-

  • या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात.या मध्ये नत्र अमाईड,अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो.या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो.

१२:६१:०-

  • या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो.तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो.

०:५२:३४-

  • या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य भरपूर आहेत. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे.डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते.
१३:०:४५-

  • या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात.यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. फुलोऱ्यानंतर च्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते.अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.या खतामुळे पाणी कमी असताना पिके तग धरू शकतात.

०:०:५०+१८-

  • या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात.पालाश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध सल्फेट भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते. पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते.हे खत फवारले अशकते.या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते.
१३:४०:१३-

  • पात्या ,फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते.व अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.

कॅल्शियम नायट्रेट -

  • मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात व शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.

२४:२४:०-

  • यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे.शाखीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.

डाळिंब फवारणीत काेन काेनते प्राेडक्ट मिक्स करु शकताे

काेन काेनते प्राेडक्ट मिक्स करु शकताे :


  • शेतकरी बंधूंनो,आपण आज रासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक जाणून घेणार आहोत.
  • कुठलेही कीटकनाशक खरेदी करताना सर्वसाधारण पणे त्याच्या टक्केवारीच्या मागे आपण EC/SC (इ.सी/ एस.सी) असे लिहिलेले पाहतो. त्याचे कारण व आपल्या फवारणी द्रावणावर त्याचा काय परिणाम होतो हे आपण जाणून घेवूया...
  1. ईसी(EC) (ईमल्सीफ्लूएबल कॉन्सट्रेशन) :

  • उदाहरणार्थ - ट्रायझोफॉस ईसी असते.
  • हे औषध ऑर्गानिक ऑईल सॉल्वंट म्हणजे पारदर्शी द्रवरूप स्वरूपात असते. त्याला पाण्यात टाकले असता ते पांढरे दुधी रंगाचे होते.
  • इसी औषध प्रकाराची चांगली गोष्ट म्हणजे हे औषध द्रव लवकर ऍक्टिव्ह किंवा मिश्रण होते.
  • ईसी प्रकारच्या औषधाची दुबळी बाजू म्हणजे यात  एकापेक्षा अनेक कीटकनाशके एकत्र केले तर त्याक्षणी आपल्या दुसऱ्या औषधाची पावर कमी होऊ शकते.
  • याकरिता शक्यतो इसी स्वरूपातील औषधे इसी टाईपच्या औषधांमध्येच मिक्स/एकत्र करा.
      2. SC (एस.सी.) सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशन-

  • एस.सी प्रकारातील औषध ही या प्रकारच्या औषधांची वरची ग्रेड किंवा सुधारित आवृत्ती आहे.
  • या केमिकल मध्ये औषधाची वेजिटेबल पावडर मिश्रण करतात व त्यापासून एस.सी प्रकारची औषधे तयार करतात.
  •  एस.सी प्रकारच्या औषधाचा फायदा एक होतो की त्यामधील औषधी केमिकल सुरक्षित होते व दुसऱ्या केमिकल मध्ये ते मिक्स होत नाही त्यामुळे शक्यतो याची रिअॅक्शन किंवा दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे आपण फवारणी करीत असलेले द्रव्य अधिक परिणामकारक होते.
  • एस.सी प्रकारच्या औषधाची एक समस्या आहे ती म्हणजे हे औषधी घट्ट, सफेद दुधी रंगात असते. ते औषध द्रवरूप होण्यास थोडा जास्त वेळ घेते. 
  • हा एवढाच या प्रकारच्या औषधांचा अवगुण आहे, पण यांची परिणामकारकता चांगली आहे त्यामुळे बहुतेक सर्व औषधे हे एस.सी स्वरूपात बनत आहेत.
  • अशा प्रकारे रासायनिक कीटकनाशकांचे वरील २ प्रकार आपण पाहिलेत. त्यानुसार आपण आपली कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घ्यावी. त्यामुळे आपल्या किटकनाशकाची परिणामकारकता वाढवू शकतो. तसेच आपल्या फवारणीचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते. यासाठी शेतकरी बंधुंनी कीटकनाशक खरेदी करताना योग्य ती माहिती जाणून घ्यावी.
  • आपण एससी व इसी(SC/EC) यातील फरक जाणून घेतला.आज आपण डब्ल्यू.डब्ल्यू./डब्ल्यू.एस. जी./डी.पी(WW/WSG/DP) या प्रकारच्या पावडर किंवा दाणेदार स्वरूपातील किटकनाशकांची माहिती पाहणार आहोत.

        3. डब्ल्यू.डब्ल्यू(WW):

  • या प्रकारची कीटकनाशके बाजारात मिळतात. यामध्ये (ऍसिफेट,बाविस्टीन) असे अनेक प्रकार आहेत. ही कीटकनाशके बनविताना सूक्ष्म पीओपी किंवा न्यूट्रल/निष्क्रिय चुना किंवा टाल्कम पावडर वापरली जाते.
  • या प्रकारची औषधे तयार करताना वरील चुना किंवा पीओपी हे वाहक द्रव्य म्हणून (कॅरियर मटरेल) वापरतात.यावर मूळ औषधातील रासायनिक द्रव्य एकत्र करून हे कीटकनाशक तयार केले जाते. 
  • आपण पाण्यात एकत्र केल्यानंतर त्यातील मुळ  रासायनिक द्रव्य पाण्यात सोल्यूबल/ विद्राव्य होते व आपणास योग्य तो परिणाम मिळतो. या कीटकनाशक प्रकारात वाहक किंवा कॅरियर मटेरियल चे प्रमाण 

          4. डब्ल्यू.एस.जी (WSG):(वाटर सोल्युबल ग्रॅन्युल्स) 

  • ही औषधे तयार करताना,त्याचे ग्राइंडिंग (बारीक कण) करताना त्याचे कण ड्रिप किंवा स्प्रे पंप यांच्या नोझल मधून पास होतील या प्रकारे  ग्राइंडर केलेली असतात.उदाहरणार्थ, सल्फर गंधक हे  WSG या स्वरूपात असते.
  • ते ड्रिप मधून किंवा स्प्रे पंप मधून जाण्यास किंवा स्प्रे करण्यात अडचणीचे ठरतात. त्यामुळे अशा प्रकारची कीटकनाशके वापरतांना फडक्याने वस्त्र गाळ किंवा गाळून घ्यावी व ती स्प्रे पंपामध्ये किंवा ड्रीप सिस्टीम सोडावी. 
  • त्यामुळे आपले होणारे नुकसान टळते व आपणास कीटकनाशकाचे अपेक्षित परिणाम मिळता

       5.एस.जी.(SG) :(सोल्युबल ग्रॅन्युल्स)

  • ही कीटकनाशके तयार करताना योग्य प्रमाणात स्टार्च व पीओपी यांचे मिश्रण कीटकनाशक टाकून नूडल्स/ शेवाया तयार केल्या जातात.त्या पाण्यात टाकल्या असता विरघळतात.
  •  उदाहरणार्थ -एक्टारा.

       6. डी.पी.(DP): (डस्टिंग पावडर) 

  • ही कीटकनाशके तयार करताना कॅरियर किंवा वाहक मटेरियल जास्त प्रमाणात वापरतात. कारण ही कीटकनाशके कोरड्या स्वरूपात डस्टर द्वारे पिकावर धुरळणी केली जातात.
  • यामुळे ही कीटकनाशके पाण्यात द्रावण शील असत नाही. यासाठी यांचा फवारणीसाठी उपयोग करू नये.
  • उदाहरणार्थ -फेनवलरेट ५ टक्के पावडर
  • बाजारात काही पावडर युक्त कीटकनाशकांमध्ये सूक्ष्म सिलिका अर्थात सिलिकॉन वापरले जाते. त्यामुळे त्या कीटकनाशकांचा चांगल्या प्रकारे परिणाम मिळतो,त्यामुळे बाजारात पावडर युक्त कीटकनाशके घेताना ती उपलब्ध असल्यास सिलिकॉन युक्त कीटकनाशके घ्यावी.
  • त्यामुळे पिकास अतिरिक्त सिलिकॉन मिळून पीके सशक्त होतात व कीटकनाशकाचे अपेक्षित परिणाम मिळतात.

खाली काही फवारणी औषधे दिली आहेत ते तुम्ही मिक्स करून वापरू शकता:

  • कर्जट +कॉपर
  • बाविस्टीन + कॉपर
  • रोको + अंट्राकाल
  • सिविक + अट्राकाल.
  • अमिस्टार + सिविक
  • कोबाल्ट सल्फेट + अंट्राकाल 
  • फॉलिओ गोल्ड + प्रोफाईट
  • बाविस्टीन + कुमान
  • रोको + कुमान 
  • किटाझीन + झेड७८
  • कॉपर + एम ४५
  • अक्रोबँट + पॉलिराम
  • इक्वेशन प्रो + कॉपर
  • सुडो + बँसिलस
  • रोको + कॅपटाप
  • कॅपटाप + डोमार्क
  • डोमार्क + सल्फर 
  • कान्टफ + कॅपटाप
  • रिडोमील + कॉपर
  • बोर्डो + सल्फर
  • फॉलिक्युर + सल्फर
  • फॉलिक्युर + रोको
  • फॉलिक्युर + अट्राकाल
  • स्कोर + कुमान
  • स्कोर + कवच
  • टिल्ट + स्कोर
  • टिल्ट + कुमान
  • मेलोडी डयुओ + टिल्ट
  • एलिऐट + सेक्टीन
  • एलिऐट + अंट्राकाल
  • एलिऐट + एम ४५
  • कॅराथेन + एम ४५
  • बाविस्टीन + एम ४५
  • सिवीक + एम ४५
  • फॅन्टीक एम + कॉपर
  • सिस्थेन + पो बायकार्बोनेट
  • डोमार्क + पो बायकार्बानेट
  • डोमार्क + एम ४५


-व्हायरस साठी नुसते स्प्रे करून चालत नाही. व्हायरस हा मुळी मार्फत सुद्धा झाडात प्रवेश करतो. त्यामुळे सगळ्यात पहिले झाडाची मुळी सुरु ठेवणे . त्यासाठी मुळीवर  काम करणे तितकेच गरजेचे असते. झाडाच्या मुळांना ऑक्सिजन चा पुरवठा  होणे तितकेच गरजेचे असते. 

-पांढरी माशी थ्रीप्स तुडतुडे यासाठी चांगले औषध स्प्रे करणे

 व्हाईट प्लाय

  • पेगासिस १ ग्रम
  • आसिटामिपीड ०.५ ग्रम
  • कराटे १ मिली
  • अक्टरा ०.५ ग्रम
  • बायो ३०३ १.५ मिली
  • बायो फ्युज ३ मिली
  • सोलोमन १ मिली
  • अलिका ०.५ मिली
  • असिफेट १ ग्रम
  • उलाला ०.४० ग्रम
  • ओशिन १ ग्रम
  • निबोळी अर्क २ मिली
  • टोटो १ मिली
  • सिनमॅक २ मिली

व्हायरस आला असेल तर ..

एक फॉर्म्युला पण चांगला आहे 

  • ओरिजिनल गीर गाईचे दूध 2ली + हळकुंड ची पावडर 250 ग्राम /100 ली पाणी  एकत्र करून असे दर 15 दिवसाला एक स्प्रे केला तर चांगला परिणाम बगायला मिळतो. ( हळकुंड घरी आणून पावडर करावी  रेडिमेड पावडर वापरु नये)

थ्रिप्स:

  • मावरिक ०.३ मिली 
  • कराटे १ मिली
  • रिजेन्ट २ मिली 
  • लेसेन्टा ०.३० ग्रम
  • कान्फीडोर १.२५ मिली
  • सोलोमन १ मिली
  • मोव्हन्टो एनर्जी १ मिली
  • डेलिगेट ०.७५ मिली
  • स्पिन्टार ०.५० मिली
  • रोगोर १ मिली

अळी:

  • ईमामेक्टीन ०.४ ग्रम
  • टाकुमी ०.५ ग्रम
  • कोरोजन ०.३० मिली
  • फेनवरलेट १ मिली
  • लार्विन १.५ ग्रम


डाळिंब पिकासाठी बुरशीनाशकांची निवड

डाळिंब पिकासाठी बुरशीनाशकांची निवड


महत्वाच्या सूचना :- 

1. पावसाळी किंवा दमट हवामानात सपर्क बुरशीनाशका चा वापर करावा...

2. स्वच्छ वातावरणात सिस्टेमेटिक बुरशीनाशकाचा वापर करावा....

3. प्रत्येक बुरशीनाशकात फ्रूट चार्जर 5 ते 7 ml + वाटर चार्जर 0.1 ml पर लीटर नियमित वापरावे. 

4. झाडावर दव किंवा पानी असल्यास एकरी लागणारा डोस आहे तेवढेच ठेवून पानी निम्मे घेवून दुप्पट वेगाने फवारणी करावी

5. औषधे मिसळण्या पूर्वी पाण्याचा पीएच तपासून फ्रूट चार्जर टाकून व लिंबू पिळून 7 वर आणावा.

6. सर्व बुरशीनाशक फवारणी सोबत फंगी क्लीनर 1ते 2 gm पर लिटर ने मिक्स करावे यामुळे पिकांची प्रतिकार शक्ति वाढून 100% कण्ट्रोल मिळतो. 

7. रोगची लक्षणे दिसल्यासच बुरशीनाशक घ्यावे , गरज नसल्यास केवळ आर्गेनिक किंवा कॉन्टॅक्ट चा वापर करावा. फ्लॉवरिंग मध्ये सिस्टेमेटिकचा(संपर्क रहीत बुरशीनाशकाचा) स्प्रे घ्यावा...

 कोणत्या हि फळा वरिल डागा साठी...

  • ब्लायटोक्स (कॉपर ऑक्सिक्लोराइड) 2 ते 2.5 gm
  •  कोसाइड 2000 ( कॉपर हैड्रोक्साइड) 1 gm
  •  M 45 (मैंकोजेब) 2 ते 3 gm
  •  झेड 78 (झायनेब) 2 ते 3 gm 
  •  कुमान एल (झायरम) 2 ते 3 ml 
  •  एंट्रकॉल (प्रोपिनेब) 2 ते 3 gm 
  •  कैप्टॉप ( कैप्टेन ) 2 ते 3 gm 
  •  कवच (क्लोरोथेलोनील) 2 ते 3 gm


सामान्य:- नियमित वापर


  • बाविस्टीन ( कार्बनडेझीम) 1 gm
  • टिल्ट (प्रोपिकोनेज़ोल)0.5ते 1ml
  • स्कोर (डीफेनेकोनेजोल) 0.5 ml
  • फोलिक्युर (टैबूकोनेज़ोल) 1 ml


 कमी तिव्रता असलेले साधारण प्रादुर्भाव वापर (कॉन्टॅक्ट व सिस्टेमेटिक)


  • साफ़ ( कर्बडेझीम + मैन्कोजेब) 2 ते 3 gm
  • रेडोमिल गोल्ड ( मेटालेक्झिल + मेंकोझेब ) 2 ते 3 gm 
  • ताक़त ( हेक्झाकोनेझोल+ कैप्टेन ) 2 ते 3 gm 
  • प्रोफाइलर (फ्लूपिकोलाइड + फोसेटील ) 1.5 ते 2.5 ml 
  • नेटिवो (टैबूकोनेज़ोल +ट्रीफलोझायस्ट्रोबिन) 0.5 gm
  • कस्टोडिया (टैबूकोनेज़ोल + ऐजोझायस्ट्रोबिन ) 1 ml


स्पेशल :- जास्त प्रादुर्भाव असल्यास वरिल बुरशीनाशकाचा वापर करावा..


  • कैब्रीओ टॉप (पायरक्लोस्ट्रोबिन  + मेटीराम ) 1 ते 1.5 gm
  • एक्रोबेट ( डायमेथोमॉर्फ़ + मैन्कोजेब) 1 gm
  • मेलोडी डुओ (इप्रोवह्यालीकारब + प्रोपिनेब) 2.5 ते 3 gm
  •  कर्झट (सायमोक्सीनिल + मैन्कोजेब) 2.5 gm
  •  इंफिनिटो (फ्लूपिकोलाइड + प्रोपेमोकार्ब-HCl) 2.5 ते 3 ml (☝एंथ्रेक्नोज दबका रोगासाठी)
  • रनमैन  (सायझोफॅमिड) 80 ml पर एकर ( कुज, करपा ,सड़ रोगासाठी ) वरिल बुरशी नाशकाचा रिझल्ट चांगला येतो.....

काही कमी खर्चात प्रचलित नावे आहेत घटक तोच असून व्यापारी नावे अनेक असू शकतात उदा . ब्लायटोक्स किंवा ब्लू कॉपर हे वेगवेगळ्या कंपनी चे प्रोडक्ट असले तरी घटक एकच आहे 

 त्यामुळे जे प्रभावी रिजल्ट देते व् स्वस्त आहे त्यांची निवड करावी 

अलीकडच्या काळात अनेक मेक इन इंडिया चे प्रोडक्ट मार्केट मध्ये आले आहेत खात्री करुण ते वापरता येवू शकतात !! 

वर दिलेले कोणताही एकच औषधीचा   एका वेळी वापर करावा...

फवारणी सकाळच्या वेळी घ्यावी.

डाळिंब झाडांवर आणि फळांवर बुरशीचा प्रादुर्भाव कसा होतो ?

 डाळिंब झाडांवर आणि  फळांवर बुरशीचा प्रादुर्भाव कसा होतो ?


बुरशीला स्वतःचे पोषण करण्यासाठी झाडात असलेली अन्नद्रव्ये खाणे गरजेचे असते . हीच अन्नद्रव्ये खाऊन बुरशीची वाढ होत असते . मात्र , बुरशीचा झाडावर नेमका कसा प्रादुर्भाव होतो याचे एक विशिष्ट प्रकारचे चक्र असते . ते कसे काम करते हे पाहूया : 

बुरशीचा झाडावर आणि फळांवर प्रादुर्भाव :

  •  झाडाच्या सभोवतालच्या वातावरणात बुरशीचे बीजाणू ( स्पोअर्स ) असतातच . हे बीजाणू झाडाच्या पानावर येऊन बसतात . ही फक्त एक सुरुवात असते . 
  • पानावर स्थिर झाल्यानंतर ही बुरशी एक चिकट पदार्थ बाहेर टाकते , ज्यामुळे हे बीजाणू पानाला घट्ट चिकटून बसतात . परिणामी , जोरदार पावसातदेखील ही बुरशी पानापासून वेगळी होऊ शकत नाही .
  • यानंतर बुरशीची वाढ सुरू होते . सर्वप्रथम हे बीजाणू पानातील पाणी घ्यायला सुरुवात करतात . बियांपासून जसे अंकुर फुटतात तशाच पध्दतीने बुरशीच्या बीजाणू पासून बुरशीचा जन्म होतो . या नवीनच जन्म झालेल्या बुरशीला अन्नाची फार गरज असते . ही बुरशी अन्न मिळवण्यासाठी बारीक धाग्यांसारखे तंतू ( hyphae ) इतस्ततः पसरवण्यास सुरुवात करतात . हे तंतू विशिष्ट प्रकारचे द्रव बाहेर टाकतात जेणेकरून झाडाचा तो भाग बुरशीसाठी खाण्यायोग्य होईल . यामुळे झाडाला मोठ्या प्रमाणात इजा होते . 
  • त्यानंतर हे तंतू झाडाच्या आतील भागांत प्रवेश करून हल्ला करतात . एखादी जखम किंवा पर्णछिद्रे यामधून देखील ते तंतू प्रवेश करतात . यानंतर ही बुरशी पेशींच्या आत किंवा दोन पेशींच्या मधील भागातून वेगाने वाढायला सुरुवात होते . यालाच आपण बुरशीचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग झाला असे म्हणतो . 
  •  यानंतर हीच बुरशी नवीन बीजाणू तयार करते आणि हे बीजाणू पानाच्या पृष्ठभागावर देखील तयार होतात . हेच बीजाणू पुन्हा हवेद्वारे इतरत्र उडून नवीन झाडांवर हल्ला करतात . 


बुरशीवरील उपाययोजना:

बुरशी  हे चक्र असेच सुरू राहते . म्हणून , आपल्याकडे बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास ती बुरशी कोणत्या अवस्थेला आहे याचा विचार करून स्पर्शजन्य की आंतरप्रवाही यापैकी कोणते ( किंवा दोन्हीही ) बुरशीनाशक वापरावे हे ठरवावे . हा विचार करून काम केल्यास आपले काम अतिशय प्रभावी होईल व अनावश्यक स्प्रे चे पैसेही वाचतील .