Monday, August 24, 2020

पाण्याचा Ph(सामू) व त्यामुळे फवारणीवर होणारे परिणाम

 

पाण्याचा Ph(सामू) चे पिकावरील फवारणीचे परिणाम :-

  • आज शेतकरी शेतीतील डाळिंब तसेच इतर पिकांवर अनेक प्रकारचे किटकनाषक, बुरशीनाशक, तणनाशक इत्यादी. औषध फवारता परंतु पाहिजे तसा औषधाचा रिजल्ट मिळत नाही. त्यामुळे पिक रोगांना बळी पडणे तसेच उत्पन्नात घट होणे असल्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.
  • कुठल्याही पिकावर फवारणी करत असताना फवारणी साठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा Ph(सामू) सर्व प्रथम तपासाने गरजेचे आहे.
  • Ph (सामू) योग्य ठेवल्यास पिकाकडून या द्रावणाचे शोषण चांगले होते.  कुठल्याही पिकावरील कीड व रोगाचे नियंत्रण चांगले मिळण्यास मदत होते. कीडनाशकाची क्रियाशीलताही अधिक काळ राहिल्याने अपेक्षित परिणामही चांगले मिळतात. मात्र, बहुतांश शेतकरी फवारणीसाठीच्या पाण्याच्या दर्जाकडे लक्ष देत नाहीत. 
  • पाण्याच्या स्रोतामध्ये औद्योगिक रसायने, शहरातील प्रदूषित पाणी इत्यादी. घटक मिसळले गेल्याने ते वापरण्यायोग्य राहत नाहीत. त्याचा Ph (सामू) 7 पेक्षा अधिक (7.5 ते 9 पर्यंत) असतो.


Ph(सामू) म्हणजे काय :-

  • Ph(सामू) म्हणजे पोटेन्शिअल ऑफ हायड्रोजन.
  • Ph(सामू) मूल्य किंवा सामू हे द्रावण आम्ल(Acidic) आहे की अल्कली (Alkaline) ते मोजण्याचे एकक आहे.



  • पाण्याचा Ph किंवा सामू हा 1 ते 14 मध्ये मोजतात.
  • पाण्याचा Ph(सामू) त्यातील धन भार किंवा ऋण भारीत आयनांच्या प्रमाणावरून ठरतो.
  • Ph मोजत असताने पाण्यामध्ये धन भाराचे प्रमाण अधिक असते ते पाणी आम्लधर्मीय (Acidic) असते. 1 ते 7  अंकापर्यंतचा Ph हा आम्लधर्मीय(Acidic) असतो.
  • ज्या पाण्यात ऋण आयनांचे प्रमाण अधिक असते, ते पाणी अल्कधर्मीय असते. 7 पासून पुढे 14 पर्यंतचा Ph हा अल्कधर्मीय (Alkaline) समजतात. 
  • पाण्याचा Ph 7 असेल तर उदासीन (Neautral) असते.

 

फवारणी योग्य पाण्याचा Ph(सामू) :-

  • फवारणी करण्या अगोदर आपण वापरत असलेल्या पाण्याचा Ph माहीत करून घेणे आवश्यक आहे. 
  • फावरणीला  वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा Ph(सामू) जर 8 ते 9 च्या दरम्यान असेल त्या पाण्यात फवारणीचे कुठलेही औषध टाकून केलेल्या द्रावणामध्ये  क्रिया हि जलद घडते. परिणामी अशा द्रावणाचे शोषण पिकांकडून कमी प्रमाणात होते. अपेक्षित परिणामही मिळत नाहीत. 
  • त्यामुळे फवारणीसाठी वापरलेल्या पाण्याचा Ph(सामू) योग्य म्हणजे 6 ते 7 च्या दरम्यान असावा म्हणजे या द्रावणाचे पिकाकडून चांगले शोषण होते. अशा पाण्यामध्ये मिसळलेल्या घटकाचे विघटन लवकर होते. या प्रक्रियेला अल्कलाइन हायड्राॅलिसीस’ म्हणतात.
  • फवारणी साठी वापरले जाणारे पाणी जास्त प्रमाणात आम्ल (Acidic) किंवा अल्कली (Alkaline) असेल तर परिणामी फवारणीचा पाहिजे तसा रिजल्ट मिळत नाही.


पाण्याचा Ph कसा स्थिर करावा-

साधारणपणे बोरवेल, विहीर, तळे इत्यादी. च्या पाण्याचा Ph 7 पेक्षा जास्त असतो. Ph 7.5 ते 8.5 असतो.   


1)पाण्याचा Ph 7 पेक्षा जास्त आहे तर...,

  • पाण्याचा ph कमी करण्यासाठी सायट्रिक ॲसिड किंवा घरगुती लिंबाचा वापर करतात.


 

Ph (सामू) कसा तपासावा:-

  • पाण्याचा पीएच तपासण्यासाठी लिटमस पेपरचा वापर केला जातो. मात्र त्यामुळे पाण्याचा नक्की सामू समजत नाही. बाजारात डिजीटल पीएच मीटर उपलब्ध आहे. त्याचा वापर केल्यास नेमका पीएच कळतो. Ph मीटर चा वापर करून आपण योग्य Ph चेक करू शकतो.

-पाण्याचा Ph (सामू) चेक करण्यासाठी खालील गोष्टींचा वापर करू शकतो,

1)लिटमस पेपर-  

  • लिटमस पेपर चा वापर करून पाण्याचा Ph(सामू) मोजता येतो.                                




2)Ph Meter .

  • Ph मीटर चा वापर करून पाण्याचा अचूक Ph चेक करू शकतो.



 

No comments:

Post a Comment