डाळिंब शेती सततचा व अवकाळी पाऊस
सततच्या तसेच अवकाळी पावसामुळे डाळिंब शेतीत अमाप
नुकसानाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी काही उपाययोजना.
१)पानगळ करणे-
शेतकरी पानगळ करत असताने अनेक समस्यांना सामोरे जातात सततचा पाऊस असल्या कारणाने अनेक वेळा पानगळ पाहिजेतशी होत नाही.
पानगळ हि पावसाळ्यात 15 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर या दरम्यान करतात. बरेच शेतकरी सप्टेबर मध्ये पाणी देतात. बऱ्याच शेतकऱ्यांची पानगळ यादरम्यान राहून जाते.
पानगळ उपाययोजना :-
- डाळिंब बागेचे पाने जर 25-30% पेक्षा जास्त बाग लिक झाली नसेल तर पानगळ त्यादरम्यान केली तरी चालेल.
- बागेला पूर्ण विश्रांती दिलेली असेल तर पानगळ करताने पाण्याचे व इथ्रेल चे प्रमाण वाढून घावे व पानगळ करावी.
- काही बागा लिक होऊन 30% पेक्षा जास्त नवीन पाने निघाली असतील व फुले निघण्याची काही शक्यता नसल्यास एक महिना ते दीड महिना थांबून पानगळ करून घ्यावी.
- जर बागेची पानगळ न करता पालवी निघाली असेल व फुलकळी काही प्रमाणात दिसत असेल तर त्यासाठी योग्य ती फवारणी घेणे.
काही महत्वाचे मुद्दे-
- सततचा पाऊस तसेच वातावरण साफ नसेल तर पानगळ शक्यतो टाळावी कारण साफ वातावरण नसेल तर पानगळ चांगल्या प्रकारे होणार नाही. वातावरण साफ झाले कि मगच पानगळ करावी.
- आपल्या बागेला किती नवीन पालवी आहे यानुसार पानगळ करावी कि नाही हे ठरवावे. बाग लिक होऊन पालवी निघाली असेल व फुलकळी काही प्रमाणात दिसत असेल तर त्यासाठी योग्य ती फवारणी घेणे.
- पानगळ करताना करताने काही गोष्टींकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. धुके, दैवर, झाडाच्या पानांवर पावसाचे पाणी नसताना मारावी, व फवारणीसाठी नेहमीपेक्षा अधिक 50 ते 60 लिटर जास्त पाणी घेऊन सावकाश पानगळ करावी जेणेकरून परत पानगळ करण्याची गरज पडणार नाही. अशाप्रकारे पानगळ केली तर पानगळ चांगल्या प्रकारे होइल.
२)पानगळ नंतर चे व्यवस्थापन :-
- नवीन पानगळ केलेल्या बागांनकडे विशेष लक्ष देणे तितकेच मगहात्वाचे असते. झाडांच्या पानांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कारण पाने चांगली राहिली तरच झाडांना फुले व्यवस्थित निघतील त्यामुळे पानगळ नंतर चौकी अवस्थेतील ज्या बाग असतील त्यांनी पानांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
पानांवर डाग पडू नये उपयोजना-
- पानांवर कुठल्याही प्रकारचे डाग पडू नये त्याकरिता खालील पैकी किमान दोन फवारणी घ्या , नंतर साधी-साधी फवारणी सुरू ठेवा जेणे करून पानांवर डाग पडणार नाहीत आणि परिणाम चांगला मिळेल.
1)Natio 0.5 ग्राम/लिटर
2)Blue Coper 2.5 ग्राम/लिटर + streptocycline 50 ग्राम/200 लिटर.
3)Cabrio top 2.5-3 ग्राम/लिटर.
4)Aliette 1 ग्राम/लिटर + Antracol 2 ग्राम/लिटर
- ज्या बागांची नवीन पानगळ केली आहे. अशा बागांना ड्रीपने तसेच स्प्रे मधून N.P.K. आणि मिक्स माइक्रोन्यूट्रिएंट दिलेले फायदेशीर राहते.
- बागेत जर फुलकळी पाहिजे त्या प्रमाणात निघत नसेल तर खालील उपाययोजना करणे फायदेशीर राहील.
- ड्रीपने 4 ते 5 kg. सल्फर एकदा व 5 kg 00:52:34 दोन वेळा सोडावे. म्हणजे फुलकळी निघण्यास मदत होईल.
- बागेत खालील प्रमाणे फवारणी घेतली तर फुलकळी निगण्यास मदत होईल.
1) 00:52:34 2.5 ग्राम/लिटर ची एक फवारणी घ्यावी.2)बोरॉन 1 ग्राम/लिटर + माइक्रोन्यूट्रिएंट 1 ग्राम/लिटर.
बागांमधील फुटावा :
- बागेत फुटवा जास्त प्रमाणात निघतो त्यामुळे झाड जर गच्च भरले तर परिणामी फवारणी नीट बसत नाही तसेच फळाला अन्नपुरवठा कमी होतो.
- बागेत फुटवा जास्त निघत असेल तर पाणी कमी करावे. तसेच फुटवा काढून घेणे देखील योग्य राहील तसेच खालील उपयोजना करने फायद्याचे राहील.
ड्रीपद्वारें देणे:
- 00:52:34, 5 किलो ड्रीपद्वारे सोडावे .
फवारणी देणे:
- खालील पैकी 1-2 फवारणी घेणे योग्य राहील.
1)0:52:34 2.5 ग्राम/लिटर2)Tilt 0.5 मिली/लिटर + Cuman-L 2.5 मिली/लिटर.
3)Planofix 0.5 मिली/लिटर + Boron 1.5 ग्राम/लिटर.
3)फुलकळी अवस्था-
- बाग सध्या फुलोऱ्यात आहे. त्यांनी खालील गोष्टीकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे,
1)फुलांची गळ होणार नाही.2)फुलांवर डाग येणार नाही.3)पानांवर डाग येणार नाही.4)झाडांची मुळी चांगली सुरु राहील इत्यादी.
फुल व पानांवरील डाग उपयोजना:
- काही बागांमध्ये फुलांवर तसेच पानांवर डाग पडणे असल्या समस्या फुलोऱ्यात उदभवतात डाग येणे बंद व्हावे तसेच नवीन फुलांवर व पानांवर येणे बंद व्हावे यासाठी खालील काही फवारणी घेऊ शकता.
- खालील फवारणी डाग येऊ नयेत म्हणून सुद्धा उपयुक्त राहातील.
1)Natio 0.5 ग्राम/लिटर.2)Score 0.5 मिली/लिटर + kavach 1.25 ग्राम/लिटर.3)Blue Coper 2.5 ग्राम/लिटर + streptocycline 50 ग्राम/200 लिटर.4)Aliette 1 ग्राम/लिटर + Antracol 2 ग्राम/लिटर5)Contaf 1 मिली/लिटर+ captaf 2.5 ग्राम/लिटर
बारीक फुल जळत आहे उपयोजना :
- काही बागांमध्ये फुल कुणी जळून गळते असल्या समस्या साठी खालील पैकी एक फवारणी घेणे फायदेशीर राहील,
1)Roko 1 ग्राम/लिटर + Cuman-L 2.5 मिली/लिटर.
2)Bavistin 1 ग्राम/लिटर + Cuman-L 2.5 मिली/लिटर.
3)Natio 0.5 ग्राम/लिटर.
झाडाची पांढरी मुळी:
- काही बागांमध्ये पांढऱ्या मुळी दिसत नाही अश्या बागांना सल्फर 4 ते 5 किलो/एक्कर ड्रीप ने द्यावे जेणे करून पांढरी मुळी चांगली चालण्यास मदत होईल.
4)बागेच्या सेटिंग नंतर (फळ लिंबू आकाराचे झाले आहे)
- पावसाळ्यात येणारा पाऊस तसेच वातावरण ढगाळ असेल तर बागेमध्ये फळांवर डाग येऊ नये म्हणून खालील फवारणी घेत चला .
- सतत एका मागे एक खालील फवारणी घेतली तरी नंतर बुरशी रोगराई कंट्रोल होत नाही. त्याकरिता 2-3 साध्या फावारण्या झाल्या की मग खालील एक फवारणी घ्या.
1)Natio 0.5 ग्राम/लिटर.2)Score 0.5 मिली/लिटर + kavach 1.25 ग्राम/लिटर.3)Contaf 1 मिली/लिटर + captaf 1.50 ग्राम/लिटर.4)Score 0.5 मिली/लिटर. + Kocide 1 मिली/लिटर.5)custodia 1.25 मिली/लिटर.6)Blue Coper 2.5 ग्राम/लिटर + Bromopol 50 ग्राम/200 लिटर7)Kitazin 1 मिली/लिटर + M45 2 ग्राम/लिटर.
- बागेमध्ये सतत खूप प्रमाणात पाऊस होत असेल तर कॉपर+सल्फर ची डस्टिंग बेडवर करणे फायद्याचे राहील.





No comments:
Post a Comment