Friday, August 7, 2020

डाळिंब बागेतील विद्राव्य खतांचे नियोजन

फळ फुगवणीसाठी  ड्रीपचे वेळापत्रक :-

 


फळधारणा झाल्यानंतर लिक्विड ग्रेड कधी सोडाव्यात या विषयी माहिती ...

12/61/00
  •  या ग्रेड चा वापर साधारण फळ लिंबू आकारात असताना चालू करावा. फळ लिंबू आकार ते पेरू आकारात होईपर्यंत या ग्रेड चा वापर करावा.

13/40/13
  • फळ साधारण पेरू आकाराचे झाल्यावर या ग्रेड चा वापर करावा. फळ पेरू आकार ते फळ काढणीला एखादा महिना बाकी असेपर्यंत हि ग्रेड द्यावि.

00/52/34
  • बागेतील फळ काढणीला एखादा महिना बाकी असताना हि ग्रेड चालू करावी. 34% पोटॅश असल्याने शेवटच्या स्टेज मध्ये दाण्यांमध्ये साखर उतरून चांगला कलर व साईज होण्यास या ग्रेड चा फायदा होतो.

00/00/50
  • बागेतील फळ काढणीला 10-12 दिवस बाकी असताना या ग्रेड चा वापर चालू करावा. चांगला कलर व साईज या ग्रेड ने मदत होईल.


काही महत्त्वाचे मुद्दे -

वरील सगळ्या ग्रेड देण्या दरम्यान काही महत्वाच्या बाबी..
  • कुठलेही फळासाठी फुगवणीचे औषध सोडताना फळाची साल लूज आहे का बघा, नसेल तर आधी कॅल्शिअम बोरॉन वापरून साल लूज करावी हि फवारणी घ्यावी म्हणजे साल चांगली लूज होऊन फळ फुगवण होताना फळे तडकणार नाहीत. शिवाय स्टिम्यूलंट सोडल्यानंतर झाडाला ड्रिपवाटे चांगल्या प्रमाणात पाणी देण्यास विसरू नये.
  •  बागेला दर 21 दिवसातून ड्रीपवाटे कॅल्शिअम बोरोन देणे गरजेचे आहे.
  •  महिन्यातून एकदा मायक्रोनुट्रिअन्ट देणे फायदेशीर ठरते.
  •  एक लिक्विड ग्रेड संपल्यानन्तर मध्ये 3-4 दिवसाचा गॅप देऊन एखादी स्लरी देऊन नंतर पुढची ग्रेड चालू केली तर एकदम छान रिजल्ट भेटतील. स्लरी ने लिक्विड ग्रेड वाटे दिलेले NPK झाडाला पूर्णपणे अपटेक होतील. 
  •  ड्रिपच वेळापत्रक बनवून NPK MICRONUTRIENT STIMULANT सोडत गेलात तर झाडंदेखील सशक्त राहतात व तेल्या व मर सारख्या रोगांना देखील बळी पडत नाहीत. गरज आहे ती फक्त नियोजनपूर्वक काम करण्याची.

ज्या बागांमध्ये ड्रीपचे सर्व वेळापत्रक योग्य प्रकारे वरून देखील साईझ न होणे याला हलकी जमीन, कमी शेणखत किंवा जमिनीचा  सामू कारणीभूत असू शकतो. मागील अनेक लेखांमधून सेटिंग झाल्यांनतर ड्रीपचे वेळापत्रक काय आणि कसे असावे याबद्दल अनेकवेळा माहिती दिली आहे.ते वेळापत्रक वापरले तर नक्कीच चांगली साईझ होईल. 
वरील वेळापत्रक अवलंबले, जमिनीचा सामू पण योग्य आहे तरीही साईझ होत नसेल तर, 
काही दिवस रासायनिक खतांना विश्रांती द्यावी, आपल्या मातीचा रिपोर्ट काढून घ्यावा. खतांत असे अनेक घटक असतात कि जे मातीला चिटकून बसतात, अशा वेळी आपल्या जमिनीत जो घटक जास्ती आहे त्या जिवाणूंची स्लरी करून पिकाला द्यावी, म्हणजे  पिकाला लगेचच उपलब्ध होईल. 
१२/६१/००, ००/५२/३४ या बॅग सोडून झाल्यावर PSB फॉस्फोरस अपटेक बॅक्टरीया ची स्लरी करावी, ज्याने चांगल्या प्रकारे साईझ होईल. 
माल काढण्यास काही अवधी असताना ००/००/५० सोडून झाल्यानंतर KSB पोटॅश अपटेक बॅक्टरीया स्लरी करावी, ज्याने डाळिंबाची आणखी चांगल्या प्रकारे साईझ होऊन फळाला आतून बाहेरून एकसारखा गडद लाल रंग येतो व चकाकी वाढते.. आपल्यालाही कोणतेही कलरचे औषध सोडण्याची वेळ येणार नाही. 
त्यासाठी जर साईझ होत नसेल तर जिवाणू स्लरीचा वापर करून बघावा नक्कीच चांगले रिझल्ट आपल्याला मिळतील.

No comments:

Post a Comment